Porche 911: किंमत, लूक आणि इतिहासाची थक्क करणारी सफर
Porche 911: एक क्रीडा कारची गोष्ट :
Porche 911 ही गाडी बरेच लोकांची ड्रीम कार आहे.जवळजवळ साधारणपणे पोर्शे 911 हिने स्वतःमध्ये म्हणजेच तिच्या डिझाईन आणि परफॉर्मन्स मध्ये सातत्याने अपडेट केलेले आहेत. चला तर मग आपण या ब्लॉग मध्ये पोर्शे 911 विषयी बऱ्याचशा गोष्टी जाणून घेऊया.
Porche 911: इतिहासाचा वेध
Porche 911 हिच्या इतिहासाबाबत बोलायचे झाल्यास ते सुरू होतो 1964 सालापासून . “
खरं सांगायचं तर 1964 रोजी जी कार लॉन्च झाली ते मॉडेल 901 हे होते परंतु यावर प्युजो कंपनीने आक्षेप घेतल्यामुळे त्या मॉडेल ला “911” म्हटले जाऊ लागले. आपल्याला पाहायला मिळते की या कारमध्ये फ्लॅट-सिक्स इंजिन रियरमध्ये बसवण्यात आलेले आहे ज्या कारणामुळे ही गाडी इतरांपेक्षा वेगळी बनते.
आजची परिस्थिती सांगायची झाल्यास आपल्याला समजते की 911 ही गाडी फक्त पोर्शेचे मॉडेल नसून तिने आता रेसिंग च्या जगात ही स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. या गाडीने ले मांज रेसिंग चॅम्पियन सारखे स्पर्धांमध्ये विक्रमी विजय मिळवले आहेत.


