Skoda kushaq : 2024 वर्जन ची डिटेल माहिती
इंडियन ऑटोमोबाईल इंडस्ट्री मध्ये एक महत्त्वाच्या फेमस नावांमध्ये Skoda kushaq या गाडीच्या समावेश केला जातो खास भारतीय रस्त्यांसाठी बनवलेली ही कार आहे जी आपल्याला बेस्ट फीचर्स सोबतच पॉवरफुल परफॉर्मन्स आणि प्रीमियम आणि स्टायलिश डिझाईन बहाल करते. चला तर मग या ब्लॉगमध्ये आपण या गाडी विषयी आणखीन सविस्तर माहिती घेऊयात.
Skoda kushaq चा इतिहास
जर्मन मध्ये असलेली स्कोडा ऑटो कंपनी ही 1895 पासून ऑटोमोबाईल निर्मितीचे काम करते.ही कंपनी जेव्हा सुरू झाली तेव्हा ती खरंतर बाइसिकल बनवायची. ही कंपनी इंडियन मार्केटमध्ये 2001 पासून काम करत आहे आणि या कालावधीत त्यांनी अनेक पॉप्युलर मॉडल्स इंडिया मध्ये लॉन्च केली आहेत. कुशाक हे नाव या कंपनीने संस्कृत भाषेमधून घेतले आहे ज्याचा खरा अर्थ ” राजा ” ,”किंग “किंवा “सम्राट” असा होतो.
स्कोडा कुशाक ही कार मुळातच भारतातील खरेदीदारांच्या आवडीनुसार डिझाईन करण्यात आलेली आहे आणि इंडियन मार्केटमध्ये पहिल्यांदा 2021 मध्ये या गाडीला लॉन्च करण्यात आले.




