Volvo XC60 हायब्रिडने केली एन्ट्री, प्रीमियम डिझाइन, जास्त मायलेज आणि फीचर्सबद्दल जाणून घ्या

Volvo XC60 : एक परिपूर्ण मार्गदर्शक

Volvo XC60 ही कार Volvo या कंपनीने बनवलेली कार आहे जी या कंपनीचे सगळ्यात फेमस अशी प्रीमियम SUV आहे. 2008 रोजी लॉन्च करण्यात आलेल्या Volvo XC60 ही कार स्टार्टिंग पासूनच बेस्ट सेफ्टी फीचर्स साठी ओळखली जाते. Volvo ने सेफ्टी टेक्नॉलॉजी मध्ये एक वेगळेच लेवलची उंची गाठली आहे. आणि तिची हीच ओळख कायम ठेवली आहे ती
XC60 मध्ये देखील कायम ठेवली आहे. या गाडीच्या सेकंड जनरेशन मध्ये नवीन डिझाईन सोबत ती 2017 मध्ये लॉन्च करण्यात आली. आणि 2024 ला तिच्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी लक्झरी फीचर्स सोबत मार्केटमध्ये एन्ट्री केली आहे.

Volvo XC60 चे वैशिष्ट्ये

इंजिन आणि परफॉर्मन्स

2024 मध्ये जी कार लॉन्च झाली त्या XC60 मध्ये आपल्याला साधारणपणे 2.0-लिटर चे टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन देण्यात आलेले आहे, जे आपल्याला 250hp एवढी पॉवर आणि 350Nm इतका टॉर्क निर्मिती करते. एवढेच नाही तर आपल्याला यामध्ये प्लग-इन हायब्रीड चे मॉडेल देखील मार्केटमध्ये आता अवेलेबल झाले आहे. त्या मॉडेल मध्ये आपल्याला ज्यादा मायलेज मिळते याचे कारण म्हणजे त्यात वापरण्यात आलेली इलेक्ट्रिक मोटर. ही मोटर आपल्याला अधिक मायलेज देते. हायब्रीड इलेक्ट्रिक मोटर असलेले मॉडेल 455hp पर्यंत पॉवर निर्मिती करते.

  • स्पीड: कार च्या स्पीड परफॉर्मन्स मध्ये बोलायचे झाल्यास ही कार 0-100 किमी/तास केवळ 5.4 सेकंद कालावधीत गाठू शकते.
  • ट्रान्समिशन: या कारच्या ट्रान्समिशन मध्ये आपल्याला 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स चा ऑप्शन दिला गेल्यामुळे आपण अतिशय इजिली ही कार चालवू शकतो आणि आरामदायी राइडचा अनुभव घेऊ शकतो.

मायलेज (इंधन कार्यक्षमता)

नवीन आलेल्या हायब्रिड टेक्नॉलॉजी चा वापर केल्यामुळे XC60 यात आपल्याला अधिक चांगले मायलेज देते.

  • या गाडीचे पेट्रोल व्हेरिएंट:10-12 किमी/लि मायलेज देते.
  • तर हायब्रिड व्हेरिएंट साधारणपणे:16-18 किमी/लि एवढं मायलेज देते.

इंटीरियर आणि आरामदायीता

XC60 या कारकडे बघितल्यावर आपल्याला जाणवेल की ही कार इंटरियर लक्झरी चे बेस्ट सॅम्पल आहे.

मटेरियल या कारचा इंटिरियर मध्ये आपल्याला नप्पा लेदर सीट्स अवेलेबल करून दिल्याचे दिसून येते याव्यतिरिक्त इंटरनेट मध्ये आपल्याला उंच दर्जाचे वुड ट्रिम्स सोबतच अल्युमिनियम ॲक्सेंट्स वापरल्याचे दिसते.

तंत्रज्ञान :

या कारमध्ये आपल्याला लेटेस्ट टेक्नॉलॉजी चा ही पुरेपूर वापर केलेल्या दिसतो ज्यामध्ये आपल्याला 9-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम ही Google OS सोबत अवेलेबल करून देण्यात आलेली आहे .

एवढेच नाही तर यामध्ये आपल्याला वायरलेस ॲपल कारप्ले सोबतच अँड्रॉइड ऑटो सपोर्ट देखील उपलब्ध करून दिलेला आहे.

साऊंड सिस्टम:
कार मध्ये आपल्याला Bowers आणि Wilkins यांसारखे प्रीमियम क्वालिटीचे ऑडिओ सिस्टीम सोबतच 19 स्पीकर्स मिळतात.

सुविधा:

  • कार मध्ये आपल्याला ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल देखील दिला गेला आहे.
    -इतकेच नाही तर आपल्याला या कारमध्ये पॅनोरामिक सनरूफ देखील मिळतो जो आपल्या प्रवास अधिक आनंददायी बनविण्यास मदत करतो.

डिझाइन आणि लूक्स

Volvo XC60 या कारचे क्लासिक डिझाईन Volvo डिझाईनची इन्स्पायर झालेले आपल्याला दिसते.

  • ज्याच्या फ्रंट ग्रील मध्ये आपल्याला क्रोम फिनिश दिले गेले आहे. एलईडी हेडलाईट देखील याच्या डिझाईनची शोभा वाढवतात.
  • कारच्या मागील बाजूला स्लीक एलईडी टेल लॅम्प्स तिला अजूनच स्टायलिश लोक प्रदान करतात. त्यामुळे ती अधिकच उठावदार दिसते.

Volvo या कंपनीच्या गाड्या मुळातच बेस्ट सेफ्टी कार म्हणून प्रसिद्ध आहेत Volvo XC60 ही कार देखील हा वारसा पुढे चालवते.

  • तसेच गाडी लेनच्या बाहेर जाऊ नये यासाठी आपल्याला लेन डिपार्चर वॉर्निंग तसेच त्याबरोबर लेन कीपिंग असिस्ट सारखे फीचर्स ऍड करून दिले आहेत.
  • याव्यतिरिक्त आपल्याला ॲडॉप्टिव क्रूज कंट्रोल चे फीचर देखील या कार मध्ये अवेलेबल असलेले बघायला मिळते.

० अन्य तंत्रज्ञान:
-कार आपल्याला इझिली पार्किंग करता यावी त्यासाठी 360-डिग्री कॅमेरा देण्यात आला आहे.

  • ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग चे फीचर देखील आपल्याला या कारमध्ये उपलब्ध करून दिले गेले आहे.
  • कार मध्ये दिलेल्या ऑटोमॅटिक इमरजन्सी ब्रेकिंग फिचर मुळे आपल्याला इमर्जन्सी च्या वेळेस हे फिचर खूप उपयुक्त ठरते.

Volvo XC60 Price In India

XC60 ही प्रीमियम SUV असल्या कारणामुळे या कारची किंमत इतरांच्या तुलनेत अधिक आहे.

या कारची एक्स शोरूम किंमत साधारणपणे: ₹67.50 Lac इतकी आहे.

तर हीच आर आपल्याला ऑन-रोड किंमतीमध्ये ₹७५ पासून ७६ लाखांपर्यंत जाते.Volvo XC60 चे फायदे आणि तोटे फायदे:
सुरक्षा तंत्रज्ञान: सुरक्षिततेच्या बाबतीत Volvo आपल्याला इंटरनॅशनल लेवल चे सेफ्टी फीचर्स देत असल्यामुळे ही कार बेस्ट फॅमिली कार ठरते जी आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची खात्री देते.

लक्झरी इंटीरियर: या कार च्या इंटिरियर मध्ये आपल्याला हाय क्वालिटी चे मटेरियल वापरले गेलेले दिसते तसेच त्यामध्ये आपल्याला ऍडव्हान्स डिझाईनचे देखील वापर केलेला दिसतो.

इंधन कार्यक्षमता: या कारमध्ये वापरण्यात आलेल्या हायब्रिड टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये जास्ती मायलेज मिळते.
स्ट्रॉन्ग रोड प्रेझेन्स: या कारचे नेत्र दीपक डिझाईन सोबतच मिळणारा दमदार परफॉर्मन्स लोकांचे लक्ष तिच्याकडे वेधून घेतो. तोटे:
उच्च किंमत: Volvo XC60 सगळे प्रीमियम फिचर देत असल्यामुळे ही कार लक्झरी ब्रँडशी स्पर्धा करते त्यामुळे तिची किंमत खिशाला परवडणारी नाही.

मेंटेनन्स खर्च: प्रीमियम कार्सचा मेंटेनन्स खूपच जास्त असतो त्या साठी खूप पैसा खर्च होतो.
०कमी ग्राउंड क्लिअरन्स: प्रीमियम कार्स ना खराब रस्त्यांवर चालवताना आपल्याला खूप साऱ्या प्रॉब्लेम्सला सामोरे जावे लागू शकते. 2025 मध्ये लाँच होणाऱ्या नवीन गाड्या.

EX90 (Electric SUV)

Volvo ही कंपनी आपल्याला 2025 मध्ये Volvo EX90 ही पूर्णपणे इलेक्ट्रिक वर्जन मार्केटमध्ये लॉन्च करणार आहे.
-जिची बॅटरी: 111kWh क्षमतेची‌ असणार आहे आणि ती आपल्याला 600 किमी पर्यंत रेंज देईल असे बोलले जात आहे

  • या कारच्या सेफ्टी फीचर्स मध्ये आपल्याला ऍडव्हान्स Pilot Assist सारखे फीचर देण्यात आले आहे.
  • जितकी प्रीमियम आणि लक्झरीयस ही कार आहे तितकीच भारी तिची किंमत असणार आहे. हि कार आपल्याला :₹1.25 कोटी ला खरेदी करता येणार आहे.

० Toyota Land Cruiser 250
2025 मध्ये लॉन्च होणाऱ्या गाड्यांमध्ये अजून एक नाव आहे ते म्हणजे Land Cruiser 250, ही SUV कार तिच्या चाहत्यांसाठी पूर्वीपेक्षा अधिक पॉवरफुल मॉडेल‌ सहित एंट्री घेणार आहे.

  • या कारचे इंजिन आपल्याला:2.8-लिटर डिझेल हायब्रिड पर्याय उपलब्ध करून देते
  • या कारची किंमत साधारणपणे ₹1.8 कोटी इतकी आहे.

० Tesla Model Y (India)
Tesla देखील तिची पॉप्युलर इलेक्ट्रिक SUV, Model Y, 2025 इंडियन मार्केटमध्ये लाँच करणार आहे.

  • या कारची रेंज: 525 किमी (WLTP) एवढी आहे
  • त्याची किंमत 70 ते 75 लाख आहे.

Colour Options

खालील कलर शेड चा समावेश होतो.

  1. क्रिस्टल व्हाइट पर्ल मेटालिक
  2. ऑनिक्स ब्लॅक मेटालिक
  3. डेनिम ब्लू मेटालिक
  4. पाइन ग्रे मेटालिक
  5. फ्यूजन रेड मेटालिक
  6. सिल्वर डॉन मेटालिक

Comparison जुने मॉडेल (2020), 2024 मॉडेल, आणि 2025 EX90 मॉडेल

वैशिष्ट्ये2020 Volvo XC602024 Volvo XC602025 Volvo EX90 (अपेक्षित)
इंजिन2.0-लिटर पेट्रोल2.0-लिटर पेट्रोल हायब्रिडफुल इलेक्ट्रिक
पॉवर235hp455hp (हायब्रिड)500hp
मायलेज (इंधन/इलेक्ट्रिक)12 किमी/लि.16-18 किमी/लि.600 किमी (रेंज)
सुरक्षा तंत्रज्ञानमूलभूत सुरक्षा वैशिष्ट्येपायलट असिस्ट, 360° कॅमेराप्रगत AI-आधारित सुरक्षा
इंटीरियर डिझाइनसाधेप्रीमियम नप्पा लेदरलक्झरी आणि स्मार्ट इंटरफेस
किंमत (भारतात)₹55-60 लाख₹67.50 लाख (शोरूम)₹1.25 कोटी (अपेक्षित)

प्र) XC60 या कारची किंमत किती आहे?

उ) 2024 मधील XC60 त्या मॉडेल ची किंमत साधारणपणे अंदाजे 68 लाख इतकी आहे.

प्र)XC60 कार मध्ये कोणते इंजिन वापरलेले आहे ?

उ) या कार मध्ये 2.0-लिटर पेट्रोल टर्बोचार्ज्ड हायब्रिड इंजिन वापरण्यात आले आहे.

प्र) XC60 ही कार आपल्याला किती मायलेज देते ?

उ) हायब्रिड व्हेरिएंट असलेल्या या कारचे मायलेज 16-18 किमी/लि. इतके आहे.

प्र) हे वाहन कोणत्या प्रकारच्या ग्राहकांसाठी बेस्ट आहे?

उ) XC60 हि कारप्रीमियम लक्झरी SUV खरेदीच्या विचार करणाऱ्या सेफ्टी ला प्रायोरिटी देणाऱ्या खरेदीदारांसाठी ही बेस्ट कार आहे.

प्र) XC60 कार मध्ये किती रंग उपलब्ध आहेत?

उ) XC60 या कारमध्ये आपल्याला 6 आकर्षक कलर ऑप्शन्स मिळतात ज्यामध्ये ब्लॅक रेड व्हाईट कलर अवेलेबल आहेत.

प्र) यात कोणते तंत्रज्ञान वापरले ‌आहे?

उ) XC60 या कार च्या लेटेस्ट टेक्नॉलॉजी मध्ये आपल्याला थ्री सिक्सटी डिग्री कॅमेरा सोबतच गुगल इन्फोटेनमेंट सिस्टीम, याव्यतिरिक्त ऍडप्टिव क्रूज कंट्रोल आणि पायलट असिस्ट देण्यात आलेले आहे.

प्र) XC60 चे स्पर्धक कोण कोण आहेत?

उ) Audi Q5, तसेच BMW X3, व Mercedes-Benz GLC या कारला वोल्वो XC60 टक्कर देते.

प्र) XC60 मध्ये सुरक्षा वैशिष्ट्य काय कायआहेत?

उ) XC60 या कारमध्ये ॲडॉप्टिव क्रूज कंट्रोल तसेच ऑटोमॅटिक ब्रेकिंग इतकेच नाही तर लेन असिस्ट हे सर्व फीचर्स देण्यात आले आहेत.

प्र) EX90 इंडिया मध्ये कधी लाँच होणार?

उ) इंडियन मार्केटमध्ये Volvo EX90 2025 मध्ये लॉन्च होण्याची शक्यता वर्तवण्यात येते.

प्र) XC60 चा मेंटेनन्स खर्च कसा आहे?

उ) XC60 या गाडीच्या प्रीमियम मेंटेनन्स खर्च साधारणपणे 70 हजार ते एक लाखाच्या दरम्यान येतो.

याबाबत घ्या पुढील update साठी whatsapp किंवा telegram join करा.

असाच नवीन अपडेटसाठी आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा

https://chat.whatsapp.com/BiVKJ4X9Mue6xZFwMJrBUX

असाच नवीन अपडेटसाठी आमच्या Telegram ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा.

https://t.me/Automotonews_marathi

Hyundai i20 N-Line: ग्लोबल NCAP ची 5-Star Rating मिळालेली सुरक्षित कार