Toyota Vellfire : अबब ! 1 कोटीमध्ये जेट? नाही, ही आहे वेलफायर

Toyota Vellfire : लक्झरी एमपीव्हीचा परिपूर्ण अनुभव

Toyota Vellfire ही लक्झरी कार आहे जिचा समावेश‌ mpv मध्ये टॉपच्या कार्स मध्ये होतो. ही कार आपल्याला प्रीमियम फीचर्स सोबत ऍडव्हान्स डिझाईन आणि बेस्ट परफॉर्मन्स बहाल करते. वेल्फायरचे 2025 चे मॉडेल हे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणि ऍडव्हान्स सेफ्टी फीचर्स ने युक्त आहेत. आणि लेटेस्ट फीचर्स देखील यामध्ये अवेलेबल आहेत.

Toyota Vellfire चा इतिहास

Toyota Vellfire या कारचे फर्स्ट वर्जन 2008 रोजी जपानमध्ये लॉन्च करण्यात आले होते. ही गाडी आपल्याला टोयोटाच्या अल्फार्डच्या मॉडल डिझाईन सारखी असल्याचा भास होतो.

  • 2008: रोजी वेलफायरची फर्स्ट ‌जनरेशन मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आली.
  • 2015 ला या कारचे सेकंड व्हर्जन लॉन्च करण्यात आले.
  • 2020 रोजी इंडियन मार्केटमध्ये या कारला पहिल्यांदा लॉन्च करण्यात आली त्यामुळे एम पी व्ही मध्ये या लक्झरी गाडीमुळे क्रांती झाली असे म्हणायला हरकत नाही.
  • 2024-25 मध्ये या गाडीचे थर्ड व्हर्जन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी चा वापर प्रीमियम बनले आहे.

2024 Toyota Vellfire चे वैशिष्ट्ये

बाह्य डिझाइन (एक्सटीरियर):

2024 च्या वेलफायर मॉडेल चे एक्सटेरियर खूपच अट्रॅक्टिव्ह क्लास आणि फ्युचरिस्टिक टच देते.

  • नवीन फ्रंट ग्रिल:
    या कार मध्ये आपल्याला नवीन फ्रंट ग्रील चा वापर केलेला दिसतो जे खूप मोठे आहे मी त्याला क्रोम फिनिश देखील दिली गेली आहे.
  • एलईडी मॅट्रिक्स लाइट्स‌ :
    कार मध्ये देण्यात आलेल्या एलईडी मॅट्रिक्स लाईट मुळे कार अतिशय स्टायलिश लोक देते तसेच तिची प्रकाशमानता देखील खूप उजळ वाटते.
  • प्रीमियम अलॉय व्हील्स :
    हे लक्झरी कार मध्ये आपल्याला प्रीमियम आलाय व्हील्स दिले गेले आहेत. हे 18-इंचाचे अलॉय व्हील्स गाडीला एकदम वेगळ्या टच देतात. यामुळे गाडीचा लुक स्पोर्टी वाटतो .
  • एरोडायनामिक डिझाइन‌ :
    या कारचे डिझाईन एरोडायनामिक डिझाईन आहे जे मुळातच फ्युएल परफॉर्मन्स चांगला राहावा यासाठी खास डिझाईन करण्यात आले आहे.

आंतरिक वैशिष्ट्ये (इंटीरियर):

वेलफायर या कारचे इंटिरियर देखील खूप लक्झरीयस आणि ॲडव्हान्स आहे.

-7-सीटर लेआउट:
या कारच्या इंटरियर मध्ये आपल्याला सेव्हन सीटर लेआउट अवेलेबल करून देण्यात आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला प्रत्येक सीटसाठी स्वतःचा कम्फर्ट झोन अनुभवायला मिळतो. या कारमध्ये आपण लिविंग रूम सारखा अनुभव घेऊ शकतो.

  • लेदर अपहोल्स्ट्री:
    या कारच्या इंटरियर मध्ये लेदर अपहोल्स्ट्री साठी प्रीमियम कॉलिटी चे सॉफ्ट टच असलेले मटेरियल वापरण्यात आलेले आहे.
  • मल्टी-झोन क्लायमेट कंट्रोल:
    या कारमध्ये देण्यात आलेल्या या फिचर मुळे कार मध्ये बसलेल्या प्रत्येक प्रवाशाला त्याला हवा तसा टेंपरेचर तो सेट करू शकतो असा ऑप्शन या कारमध्ये देण्यात आलेला आहे.
  • ट्विन सनरूफ:
    लक्झरी कार मध्ये आपल्याला कारचे इंटिरियर मध्ये नॅचरली सनलाइट यावा यासाठी ट्विन सनरूफ चा ऑप्शन अवेलेबल करून देण्यात आला आहे .

  • 32-इंच पॅसेंजर स्क्रीन:
    एंटरटेनमेंट साठी हाय क्वालिटी चे 32 इंचाचे पॅसेंजर स्क्रीन डिस्प्ले या लक्झरीयस कार मध्ये आपल्याला देण्यात आले आहे.

इंजिन आणि परफॉर्मन्स:

  • 2.5-लिटर चे हायब्रिड इंजिन आपल्याला198 एचपी पॉवर देते
    -स्मूथ ड्रायव्हिंग चा अनुभव घेण्यासाठी या कारमध्ये देण्यात आलेले ई-सीव्हीटी गिअरबॉक्स चा उपयोग होतो.
  • हे कारचा इंधन परफॉर्मन्स वाढवा यासाठी आपल्याला यामध्ये स्मार्ट हायब्रीड सिस्टीम देखील देण्यात आलेली आहे.
  • प्रकार मध्ये देण्यात आलेल्या ऑल-व्हील ड्राईव्ह चा ऑप्शन मुळे आपण सगळ्या प्रकारच्या रस्त्यांवर ही गाडी सहजरित्या चालू शकतो. या गाडीची पकड सगळीकडे तेवढीच मजबूत राहते.

सुरक्षा वैशिष्ट्ये:

2024 च्या वेलफायरमध्ये सेफ्टीसाठी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी चा वापर केला गेला आहे.

  • टोयोटा सेफ्टी सेंस 3.0 त्यामुळे ॲडव्हान्स ड्रायव्हिंग चा अनुभव आपल्याला घेता येतो.
  • सेफ्टीसाठी आपल्याला या कार मध्ये 10 एअरबॅग्स अवेलेबल करून देण्यात आलेल्या आहेत.
  • कार मध्ये देण्यात आलेल्या अ‍ॅडाप्टिव्ह क्रूझ कंट्रोल पर्यायामुळे आपल्या गाडीच्या स्पीड वर आपोआप कंट्रोल केला जातो.
  • याव्यतिरिक्त कार मध्ये देण्यात आलेल्या लेन कीप असिस्ट त्या फीचर चा उपयोग गाडी लेनमध्ये ठेवण्यास होतो.

2024 वेलफायरचे वेरिएंट्स आणि किंमती

वेरिएंट्स:

० एक्झिक्युटिव्ह लाउंज हे व्हेरिएंट आपल्याला प्रीमियम लेव्हल चा लक्झरी एक्सपिरीयन्स अनुभवायला देतो.
० तर हायब्रिड झेटा हे व्हेरीएंट पर्यावरणपूरक अशा हायब्रिड टेक्नॉलॉजीचा वापर करून बनविण्यात आले आहे.
०ऑल व्हील ड्राईव्ह हे वेरिएंट आपल्याला स्टॅबिलिटी आणि मजबूत पकड बहाल करते.

किंमती (एक्स-शोरूम):

० 2024 च्या वर्जन ची किंमत साधारणपणे ₹1.2 कोटी पासून ते ₹1.35 कोटी पर्यंत आहे.
०2025 वर्जन ची किंमत अंदाजे ₹1.3 कोटी पासून ते ₹1.45 कोटी पर्यंत असण्याची शक्यता आहे.

ऑन-रोड किंमत:

० या कारची ऑन रोड किंमत साधारणपणे ₹1.4 कोटी असून ₹1.6 कोटी पर्यंत जाऊ शकते. त्याच्या किमतीमध्ये शहरा शहरानुसार थोडाफार फरक पडतो.

पूर्वीच्या वर्जनशी तुलना

० 2023 वेलफायर:

  • इंजिन हे 2.5-लिटरचे हायब्रिड इंजिन होते.
  • जुनी टेक्नॉलॉजी आणि जुने इन्फंटमेंट सिस्टीम आणि कमी फीचर्स असणारे आहे.
  • सेफ्टी साठी यामध्ये केवळ सात एअरबॅग्स मिळतात.
  • या मॉडेलमध्ये जुनेच ग्रील आणि एलईडी हेडलाइट्स असलेले डिझाईन आपल्याला मिळते.

० 2024 वेलफायर:

  • लेटेस्ट इंजिन हे आधीपेक्षा अधिक बेस्ट परफॉर्मन्स देणारे हायब्रीड इंजिन मिळते.
    -या मॉडेलमध्ये आपल्याला लेटेस्ट टेक्नॉलॉजी चा वापर केलेला दिसतो त्यासोबतच आपल्याला यामध्ये अपग्रेटेड इन्फोटेनमेंट सिस्टीम मिळते. याव्यतिरिक्त आपल्याला यामध्ये मल्टीजोन क्लायमेट कंट्रोलचा देखील पर्याय उपलब्ध होतो.
    -सेफ्टी साठी या मॉडेल्समध्ये आपल्याला दहा एअरबॅग्स मिळतात ..
  • या कारचे डिझाईन अतिशय प्रीमियम आणि फ्युचर स्टिक देते.

स्पर्धात्मक तुलना

० मर्सिडीज-बेंझ व्ही-क्लास:

  • या गाडीच्या तुलनेत आपल्याला Toyota Vellfire अधिक स्वस्त वाटते आणि वेल्फायरची फ्युएल परफॉर्मन्स देखील या गाडीपेक्षा चांगला आहे.
  • व्ही-क्लास या कारची ब्रँड व्हॅल्यू जरी खूप जास्त असली तरी देखील Toyota Vellfire मध्ये हायब्री टेक्नॉलॉजीचा वापर केला असल्यामुळे ती एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे.

० किआ कार्निव्हल:

  • या कारची किंमत कमी आहे परंतु या कार पेक्षा बेलफायर आपल्याला अधिक प्रीमियम राईडचा एक्सपिरीयन्स देते.
  • वेलफायर ही कार आपल्याला बेस्ट फीचर्स सोबत खूप लक्झरी अनुभव बहाल करते.

रंजक तथ्ये

० या कारमध्ये हायब्री टेक्नॉलॉजी चा वापर केला गेल्यामुळे ही कार एन्व्हायरमेंट फ्रेंडली बनते.
० राजकीय व्यक्तींची पसंती: Toyota Vellfire ही कार अनेक देशातील राजकीय नेत्यांची आवडती कार आहे तसेच खूप उद्योजक देखील या कारला तितकीच पसंती देतात.
० या कारचे उत्पादन जपान मध्ये असलेल्या एका विशिष्ट असेंबली लाईनवर तयार करण्यात आले आहे.
० आपल्या भारतात देखील या कारला खूप जास्त मागणी आहे 2023 मध्ये ही मागणी 40% ने वाढली आहे.

2025 Toyota Vellfire : काय अपेक्षित आहे?

  • लेटेस्ट मॉडेल मध्ये ऍडव्हान्स एआय टेक्नॉलॉजी वापरण्यात आलेली आहे त्यामुळे आपल्याला बेस्ट ड्रायव्हिंग एक्सपिरीयन्स अनुभवता येणार आहे.
  • येणारे लेटेस्ट मॉडेल मध्ये आपल्यालाही कार स्वतःच पार्किंग क्षमता असलेली फीचर घेऊन येणार असल्यामुळे ती गाडी स्वतःची स्वतःच पार्क होईल.
  • 100% हायब्रिड टेक्नॉलॉजी वरती आधारित असलेली ही कार फक्त आणि फक्त हायब्रीड वेरीएंट्स मार्केटमध्येच उपलब्ध आहे.
  • या कारमध्ये अधिक आरामदायी राईडचा अनुभव मिळावा यासाठी ऑटोमॅटिक डोअर सिस्टीम ऑप्शन देखील आपल्याला देण्यात आलेला आहे.

Q) Toyota Vellfire ची एक्झॅक्ट किंमत काय आहे?

A) या कारची किंमत साधारणपणे एक कोटी 44 लाख 43 हजार पासून स्टार्ट होते तसेच यामध्ये बाकीचे टॅक्सेस ऍड केले जातात.

Q) कोणती कार वेलफायर किंवा Q8 ई-ट्रॉन मध्ये कोण बेटर आहे?

A) कारच्या किमतीच्या बाबतीत ठरवायचं झालं तर Vellfire ची किंमत साधारण ₹ 1.22 Cr एवढी आहे तर Q8 e-tron या गाडीची किंमत ₹ 1.15 Cr पासून सुरू होते.

Q) टोयोटा वेलफायरसाठी EMI किती असेल?

A) Toyota Vellfire तर तुम्हाला EMI‌ वर घ्यायचे असेल तर तुम्हाला 14 लाख 45 हजार रुपये डाऊन पेमेंट करावे लागेल आणि पाच वर्षासाठी तुम्हाला 9.8% व्याजदराने ₹ 1.30 Cr च्या कर्जावरती दोन लाख 75 हजार इतका महिन्याला ईएमआय भरावा लागेल.

Q) टोयोटा वेलफायर ही 4×4 आहे का?

A) हो Toyota Vellfire ही कार इंडियन मार्केटमध्ये हे ट्रान्समिशन देते.

Q) टोयोटा वेलफायरमध्ये सनरूफ आहे का?

A) होय, या गाडीमध्ये सनरुफ देण्यात आलेला आहे. या कारच्या प्रत्येक वेरिएंटमध्ये आपल्याला सनरूफ येतो.

Q ) Toyota Vellfire चे मायलेज किती आहे?

A) या कारचे ARAI मायलेज 16 kmpl इतकेआहे.

Q) टोयोटा वेलफायरसाठी कोणते रंग पर्याय उपलब्ध आहेत?

A) वेलफायरसाठी आपल्याला तीन कलर शेड्स अवेलेबल करून दिले आहेत ज्यामध्ये सिल्वर, व्हाईट आणि ब्लॅक या शेड्सचा समावेश आहे.

Q) टोयोटा वेलफायर ही ७ सीटर कार आहे का?

A) हा‌, ही ७ सीटर कार आहे.

याबाबत घ्या पुढील update साठी whatsapp किंवा telegram join करा.

असाच नवीन अपडेटसाठी आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा

https://chat.whatsapp.com/BiVKJ4X9Mue6xZFwMJrBUX

असाच नवीन अपडेटसाठी आमच्या Telegram ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा.

https://t.me/Automotonews_marathi

फक्त 1 कोटींमध्ये लक्झरी SUV! Volvo XC90 ची आश्चर्यचकित करणारी खास वैशिष्ट्ये

Nissan Patrol 2024 मधील रहस्य काय? SUV प्रेमींसाठी नवा आश्चर्याचा धक्का !