315 किमी रेंजची EV: Tata Tigor EV ने कसं साध्य केलं परवडणारं तंत्रज्ञान?
सध्याची परिस्थिती तर आपल्या सर्वांना माहितीये लोक आता इलेक्ट्रिक कारला खूपच पसंती दाखवत आहेत त्यामुळे मार्केटमध्ये ही आता इलेक्ट्रिक काळजी चलती सुरू आहे मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात येत आहेत परंतु आता तुम्हाला इलेक्ट्रिक कारची खरेदी करण्यासाठी वीस लाखापेक्षा अधिक खर्च करण्याची गरज भासणार नाही आहे. कारण याची जबाबदारी आता स्वतः टाटाने घेतली आहे. खुद्द टाटा ने या बदलाचे नेतृत्व हाती घेतले आहे. तर चला मग जाणून घेऊयात आपण काय आहेत हे बदल. यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.
गोष्टीबद्दलचा आणखी पाठपुरावा केल्यावर आम्हाला असं लक्षात आलं की सध्या मार्केटमध्ये असणारी Tigor EV, ही अशी कार आहे जी भारतातली सगळ्यात स्वस्त विकली जाणारी इलेक्ट्रिक फोर व्हीलर आहे. चला तर मग आपण तिच्याबद्दल आणखी माहिती जाणून घेऊयात
Tata Tigor EV ची वैशिष्ट्ये
० कारची रेंज :- ३१५ किमी इतकी आहे
० तिची पॉवर :- 73.75 bhp एवढी आहे
० कारमध्ये आपल्याला बॅटरी क्षमता :- 26 kWh इतकी देण्यात आली आहे
० कारची चार्जिंग वेळे बद्दल बोलायचे झाल्यास
डीसी साठी :- 59 मि |18 kW(10-80%) इतका वेळ लागतो
तर AC साठी :- 9तास 24मि | 3.3 kW (0-100%) इतका वेळ लागतो
० कार मध्ये बूट स्पेस :- 316 लिटर एवढी देण्यात आली आहे
० या कारला ग्लोबल NCAP सुरक्षा रेटिंग मध्ये:- ⭐⭐⭐⭐ रेटिंग देण्यात आले आहे
Tigor EV Top features ची वैशिष्ट्ये :-
० कार मध्ये आपल्याला डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे
० त्याप्रमाणेच ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल हे फीचर देखील अवेलेबल करून देण्यात आले आहे.
० कारला सोयीस्कर रित्या पार्किंग करता यावी यासाठी पार्किंग सेन्सर्स देखील देण्यात आले आहेत.
०कार मध्ये आपल्याला पॉवर विंडोज देण्यात आले आहेत
० यामध्ये ॲडव्हान्स इंटरनेट फीचर्स देऊ केले आहेत.
० पार्किंगसाठीच बॅक कॅमेरा ऑफर करण्यात आला आहे
० कारमध्ये कीलेस एंट्री ची सोय करण्यात आली आहे.
० क्रूज कंट्रोल देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे
Tata Tigor EV Best features ची वैशिष्ट्ये :-
- कार साठी देण्यात आलेल्या कलर ऑप्शन मध्ये वापरण्यात आलेले दि बेस्ट असे क्लासही वाटणारे सिग्नेचर एक्वा-रंग उच्चार हे तिला EV आहे म्हणून लगेच ओळखण्यासारखे आहेत.
- Z Connect ॲप हे आपल्याला या कारण मध्ये खूप उपयोगी ठरते आहे कारण ते आपल्याला कारची माहिती ॲक्सेस करून देण्यास मदत करते .
3 या कारमध्ये देण्यात आलेली. 8-स्पीकर हरमन ऑडिओ सिस्टीम ही खरंच खूप इम्प्रेसिव्ह आहे. Tata Tigor EV ची किंमत किती आहे?:-
Tata Tigor EV बेस-स्पेक XE व्हेरियंटसाठी 12.49 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप-स्पेक XZ प्लस लक्स व्हेरियंटसाठी (एक्स-शोरूम पॅन-इंडिया) 13.75 लाख रुपयांपर्यंत जाते. Tata Tigor EV मध्ये किती प्रकार आहेत?
टाटा Tigor EV आपल्याला या कारचे अंदाजे जवळपास चार व्हेरियंट ऑफर केले गेले आहेत ज्यामध्ये XE, आणि XT, व XZ+तसेच XZ+ Lux. यांचा समावेश आहे.
Table of Contents
पैशाचे तुलने त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी देण्यात आले आहेत ?
बाकीच्या व्हेरिएंटयांची तुलना केल्यास आपल्याला असे कळेल की त्यामध्ये XZ+ हा इलेक्ट्रिक कारचा व्हेरियंट इतरांच्या तुलनेत उत्कृष्ट ठरतो.प्रकार हा या इलेक्ट्रिक सेडानचा सर्वोत्तम प्रकार आहे. जवळपास फक्त 14 लाखात आपल्याला अनेक फीचर्स देण्यात आले आहे ज्यामध्ये फ्रंट फ्रॉक लाईट्स याबरोबर स्टार्ट आणि स्टॉप साठी पुश बटन तसेच क्रूज कंट्रोल LED DRL सोबतीला ऑटो प्रोजेक्टर हेडलाईन्स देखील आहे आणि स्पीकर साऊंड सिस्टिम यांसारखे सुविधा या कारमध्ये देण्यात आले आहे. एवढेच काय तर रेन सेन्सिंग वायपर आणि पार्किंग साठी बॅक कॅमेरा पण देण्यात आला आहे.
Tata Tigor EV मध्ये कोणती वैशिष्ट्ये आहेत?
ही कार आपल्याला गरजेची लागणारी सगळी फीचर्स अगदी परवडणाऱ्या किमतीत देउ करत आहे. यामध्ये ८ स्पीकर साऊंड सिस्टिम देण्यात आली आहे. हे सोबतच क्रूज कंट्रोल देण्यात आले सात इंचाची टच स्क्रीन अशी इन्फोटेनमेंट सिस्टीम देण्यात आली आहे हाईट ऍडजेस्टमेंट करता यावी यासाठी आपल्याला ऍडजेस्टेबल असे ड्रायव्हर सीट देण्यात आलेले आहे.
Tigor EV ते किती प्रशस्त आहे?
या कारमध्ये इतकी जागा आहे की चार लोक सहजपणे अगदी आरामात बसू शकतात एक लहान फॅमिली साठी ही कार अगदी योग्य आहे. ही गाडी आपल्याला 316 लिटरची पोस्ट देते . जे तुलनेने आयसीइ वर्जन पेक्षा थोडी कमी आहे.
Tata Tigor EV Range किती आहे?
आता आपण या कारच्या रेंज बद्दल बोलूयात. या EV ला
जवळपास 26 kWh की बॅटरी पॅक मोटर इलेक्ट्रिक मोटर (75 PS/170 Nm) बरोबर जोडण्यात आली आहे. ARAI ने दावा केल्यानुसार या काळजी जवळपास 315 किलोमीटर आहे.
० 15 A प्लग पॉइंट ने : 9.4 तास इतका वेळ लागतो
० तर आपल्या हे लक्षात येईल की एसी होम ने ती साधारण : 9.4 तास वेळ घेते आहे.
० DC-फास्ट चार्जर: मी चार्ज केल्यास आपल्याला फक्त 59 मिनिटे इतका वेळ लागतो
Tigor EV किती सुरक्षित आहे?
ही काय सेफ्टीच्या दृष्टीने किती फीचर्स आपल्याला ऑफर करते ते बघूया. सेफ्टी फीचर बद्दल बोलायचे झाल्यास तिकीट मध्ये आपल्याला ड्युअल फ्रंट एअरबॅक्स देण्यात आले आहेत. तसेच यामध्ये आपल्याला टायर ब्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम देखील देण्यात आली आहे एवढेच नाही तर टायर पंचर रिपेअर किट देखील आपल्याला मिळते. यासोबत हिल एसेंट/डिसेंट कंट्रोल यासोबतच रिअर-व्ह्यू कॅमेरा सारख्या फीचर्स चा समावेश करण्यात आला आहे.
तुम्ही टाटा टिगोर ईव्ही खरेदी का करावी ?
अशी खूप कारणे आहेत जे आपल्याला ही कार खरेदी करण्यास भाग पाडतात पण तरी देखील सांगायचे झाल्यास Tata Tigor EV ही भारतामध्ये सगळ्यात जास्त खिशाला परवडणारी अशी इलेक्ट्रिक सेडन या कारमध्ये सगळी आवश्यक फीचर देण्यात आलेली असून शहरात फिरण्यासाठी ही एक उत्तम पर्याय ठरू शकणार आहे. तिच्या किमतीच्या मानाने तिच्यामध्ये आवश्यक असलेली सगळी फीचर देण्यात आलेली आहे. इलेक्ट्रिक कारप्रेमींना परवडेल अशा किमतीसाठी हा ऑप्शन खरंच योग्य ठरणार आहे. या कारची किंमत कमी असली तरी देखील तिच्यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यात आलेली नाही त्यामुळे तुम्ही या कारचा खरेदीचा विचार नक्कीच करण्यासारखा आहे.
Tata Tigor EV कोणाशी स्पर्धा करेल ?
ही कार ईव्हीला थेट कॉम्पिटिशन देत नसली टक्कर देत नसली तरी सुद्धा टाटा टियागो ईव्ही आणि ec3 सारख्या इलेक्ट्रिक कार ऐवजी प्रीमियम पर्याय म्हणून हिची निवड होण्याची खूप दाट शक्यता वर्तवण्यात येते.
Tata Tigor EV Price in India
टाटाच्या या कारच्या किमती बाबत बोलायचे झाल्यास आपल्याला समजते की Tata Tigor EV ची किंमत ही जवळपास ₹ 12.49 लाख पासून सुरू होत आहे आणि याचे टॉप मॉडेल हे आपल्याला ₹ 13.75 लाख पर्यंत पडते.
Tata Tigor EV बाबतीत तज्ञांचे मत:-
टाटाच्या या मॉडल बद्दल तज्ञांचे मत असे आहे की ही परवडणारी कार आहेच पण त्यासोबतच त्याचा परफॉर्मन्स देखील उल्लेखनीय आहे. शहराच्या प्रवासासाठी ही कार एक उत्तम पर्याय ठरू शकते हे नक्की. .
Tata Tigor EV safety ची सुरक्षितता:-
Tigor EV ला ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS आणि कॉर्नर स्टॅबिलिटी कंट्रोल मानक म्हणून मिळतात. ग्लोबल एनसीएपी द्वारे क्रॅश-चाचणी केलेले हे पहिले इलेक्ट्रिक वाहन आहे, जिथे प्रौढ आणि लहान मुले दोन्ही सुरक्षिततेसाठी त्याला सन्माननीय 4 तारे मिळाले आहेत.
Tigor EV चे फायदे आणि तोटे
Tigor EV बाबतीत आम्हाला आवडलेल्या गोष्टी
० ही कार आपल्याला 170-220 किमीची इतकी रेंज प्रत्यक्षात देते.
० फास्ट चार्जिंग केल्यास केवळ 65 मिनिटांमध्ये जवळपास 80% चार्ज होते .
० ही कार आपल्याला कॉलिटी राईट प्रोव्हाइड करते.
० नीट विचार केला असता चार-सहा फुटांकरता केविन त्यामानाने प्रशस्तच आहे.
Tigor EV आम्हाला न आवडलेल्या गोष्टी
० त्यामध्ये काही फीचर्स चा अभाव जाणवतो ज्यामध्ये ऍडजेस्टेबल हेडरेस्ट यांचा समावेश आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे आयसीई वर्जन पेक्षा कमीच बूट स्पेस देण्यात आली आहे.
० या काळजी इंटरियर कॉलिटी बद्दल बोलायचं झाल्यास आपल्याला एक लक्षात येईल की दहा लाखाच्या टिगोर साठी ही इंटिरियर जरी परफेक्ट वाटत असले तरीही रु. 13 लाखांच्या EV साठी हे इंटिरियर तितकेसे खास वाटत नाही
० रेंज आणि बॅटरी ची पर्सेंटेज ही किती बरोबर असेल हे कॅलिब्रेट केले जाऊ शकत नाही .
Tata Tigor EV ची रेंज :-
Tata Tigor EV ची रेंज ही वेरीएंट्स नुसार जवळपास 315 किमी इतकी आहे
Q) टाटा टिगोर ईव्हीची नक्की ऑन-रोड किंमत किती आहे?
A) शहराच्या अनुसार काळाच्या किमतीमध्ये कमी जास्त बदल हा होतच राहतो तरी अंदाजे सांगायचं झालं तर या काळाची ऑन रोड किंमत जवळपास ₹ 13,10,780 लाखापासून सुरू होत असली तरी यात आरटीओ आणि विमा शुल्क ऍड केले जात आहे..
Q) टाटा टिगोर ईव्ही पूर्णपणे चार्ज करण्यासाठी साधारणपणे किती चार्जिंग वेळ घेइल?
A) ही कार चार्ज करण्यासाठी आपल्याला जवळपास टिगोर ई – 9H 24 मिनिट एवढा वेळ निश्चित लागू शकतो.
Q) टाटा टिगोर ईव्हीची अंदाजे बॅटरीची क्षमता किती आहे?
A) Tata Tigor एव्ही कारची बॅटरी कॅपॅसिटी ही अंदाजे 26kWh एवढी आहे.
Q) टाटा टिगोर ईव्हीची रेंज नेमकी किती आहे?
A) टाटा टिगोर ईव्हीची या कार ची रेंज अंदाजे ३१५ किमी एवढी आहे.
Q) टिगोर ईव्ही किंवा सी3 कोणती कार चांगली आहे?
A) या दोन कारचे कम्पॅरिझन करायचं झाल्यास किमतीच्या तुलनेमध्ये बोलायचे झाल्यास Tigor EV ची किंमत ही ₹ 12.49 लाख ने सुरु होते आणि C3 ची किंमत मात्र ₹ 6.16 लाख आहे. आता यामध्ये अवेलेबल असणारे फीचर्स आणि तुम्हाला योग्य वाटणारे कारमधील डिटेल्स बघून तुम्ही निश्चित करू शकता की कोणती कार तुमच्यासाठी बेस्ट असेल.
Q) टाटा टिगोर ईव्हीसाठी आपल्याला EMI किंवा डाउन पेमेंट काय असेल?
A) 11.80 लाखाच्या कर्जावरती आपल्याला जवळपास EMI ₹ 24,951 दरमहा इतका पडू शकतो पाच वर्षासाठी तेही @ 9.8% व्याजदराने. पण यासाठी डाऊन पेमेंट ₹ 1.31 लाख करावे लागेल.
Q) टाटा टिगोर ईव्हीमध्ये सनरूफ आहे का?
A) Tata Tigor या कारमध्ये मध्ये सनरूफ नाहीय.
याबाबत घ्या पुढील update साठी whatsapp किंवा telegram join करा.
असाच नवीन अपडेटसाठी आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा
https://chat.whatsapp.com/BiVKJ4X9Mue6xZFwMJrBUX
असाच नवीन अपडेटसाठी आमच्या Telegram ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा.
https://t.me/Automotonews_marathi
Maruti Suzuki Fronx 2024 खरेदी कशी फायदेशीर ठरू शकते