Skoda kushaq : 2024 वर्जन ची डिटेल माहिती
इंडियन ऑटोमोबाईल इंडस्ट्री मध्ये एक महत्त्वाच्या फेमस नावांमध्ये Skoda kushaq या गाडीच्या समावेश केला जातो खास भारतीय रस्त्यांसाठी बनवलेली ही कार आहे जी आपल्याला बेस्ट फीचर्स सोबतच पॉवरफुल परफॉर्मन्स आणि प्रीमियम आणि स्टायलिश डिझाईन बहाल करते. चला तर मग या ब्लॉगमध्ये आपण या गाडी विषयी आणखीन सविस्तर माहिती घेऊयात.
Skoda kushaq चा इतिहास
जर्मन मध्ये असलेली स्कोडा ऑटो कंपनी ही 1895 पासून ऑटोमोबाईल निर्मितीचे काम करते.ही कंपनी जेव्हा सुरू झाली तेव्हा ती खरंतर बाइसिकल बनवायची. ही कंपनी इंडियन मार्केटमध्ये 2001 पासून काम करत आहे आणि या कालावधीत त्यांनी अनेक पॉप्युलर मॉडल्स इंडिया मध्ये लॉन्च केली आहेत. कुशाक हे नाव या कंपनीने संस्कृत भाषेमधून घेतले आहे ज्याचा खरा अर्थ ” राजा ” ,”किंग “किंवा “सम्राट” असा होतो.
स्कोडा कुशाक ही कार मुळातच भारतातील खरेदीदारांच्या आवडीनुसार डिझाईन करण्यात आलेली आहे आणि इंडियन मार्केटमध्ये पहिल्यांदा 2021 मध्ये या गाडीला लॉन्च करण्यात आले.
Skoda kushaq चे डिझाइन आणि इंटिरियर :
डिझाइन वैशिष्ट्ये
० स्पोर्टी लुक्स :
स्कोडा कुशाक या गाडीचे एक्सटेरियर डिझाईन हे अट्रॅक्टिव्ह आहे . तिच्यामध्ये आपल्याला LED हेडलॅम्प्स सोबतच DRLs सारखे फिचर देखील या गाडीमध्ये देण्यात आले आहेत. त्यामुळे ती अधिकच खुलून दिसते. तसेच एका गाडीमध्ये देण्यात आलेली क्रोम फिनिश ग्रिल गाडी च्या लुकला वेगळाच टच देतात.
० साईड प्रोफाइल :
गाडीच्या साईड प्रोफाईल बद्दल बोलायचे झाल्यास आपल्याला जाणवेल किंवा गाडी मध्ये आपल्याला जवळजवळ 17-इंचाचे अलॉय व्हील्स देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त या गाडीच्या साईड प्रोफाईल मध्ये आपल्याला डायनॅमिक लाईन्स देखील दिसतात.
इंटिरियर लक्झरी
० ड्युअल टोन इंटिरियर :
स्कोडा कुशाक या गाडीचे इंटिरियर मध्ये आपल्याला पाहायला मिळते की ड्युअल टोन थीम चा वापर केला गेला आहे ज्यामुळे आपल्याला अतिशय प्रीमियम आणि क्लासी लुक मिळतो.
० टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टम :
या कारमध्ये आपल्याला साधारणपणे 10-इंचाची टच स्क्रीन इन्फोटेनमेंटसिस्टीम देण्यात आली आहे. तसेच आपल्याला यामध्ये अँड्रॉइड ऑटो तसेच Apple CarPlay सारखे टीचर देखील ऍड केलेले असल्याचे दिसते.
० प्रसन्न प्रवास :
या कार मध्ये आपल्याला जवळपास 385 लीटर एवढी बूट स्पेस देऊ केली गेली आहे. तसेच या कारमध्ये देण्यात आलेले आरामदायक सीट्स आपल्या प्रवास अजून सुखकर बनवतात.
Skoda kushaq ची किंमत आणि वेरिएंट्स
० या कारच्या Active या बेस मॉडेल ची किंमत साधारणपणे 11 लाखाच्या आसपास सुरू होते.
० तर या कारच्या Style 1.5L DSG या टॉप मॉडेल ची स्टार्टिंग प्राईस 20 लाखाच्या आसपास आहे.
या गाड्यांच्या किंमती मध्ये सिटी वाईज कमी जास्त फरक पडतो. तसेच गाडीच्या ऑन रोड प्राईस इन मध्ये आरटीओ इन्शुरन्स आणि इतर टॅक्स हे समाविष्ट करण्यात येतात. त्यामुळे ही किंमत वाढवून बारा लाख ते 22 लाखाच्या दरम्यान जाते.
Table of Contents
Skoda kushaq चे इंजिन आणि कामगिरी
इंजिन पर्याय
०1.0L TSI टर्बो पेट्रोल:
-याची पावर: 115 PS इतके आहे
-तर टॉर्क: 178 Nm एवढा आहे
-आणि गिअरबॉक्स: 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक चा पर्याय आपल्याला मिळतो
० 1.5L TSI टर्बो पेट्रोल:
- इंजिन पर्याय मध्ये आपल्याला पावर: 150 PS इतकी मिळते
-तर टॉर्क: 250 Nm आणि याव्यतिरिक्त - गिअरबॉक्स मध्ये आपल्याला: 6-स्पीड मॅन्युअल किंवा 7-स्पीड DSG चे ऑप्शन अवेलेबल करून दिले आहेत
Skoda kushaq Mileage :
या कारच्या 1.0L इंजिन आपल्याला: 17-18 kmpl इतके मायलेज देते. 1.5L इंजिन आपल्याला : 16-17 kmpl एवढे मायलेज देते.
Skoda kushaq च्या प्रमुख वैशिष्ट्यांचा आढावा
० सुरक्षितता वैशिष्ट्ये
-या कारच्या सेफ्टी फीच्या बद्दल बोलायचे झाल्यास आपल्याला यामध्ये सहा एअर बॅग अवेलेबल करून देण्यात आल्याआहेत.
- तेच आपल्याला कार मध्ये ABS हे फिचर देखील देण्यात आले आहे.
- कारची स्टॅबिलिटी कंट्रोल मध्ये राहण्यासाठी आपल्याला ESC हे फीचर अवेलेबल करून देण्यात आले आहे.
- तसेच कारच्या टायर प्रेशर लक्ष ठेवण्यासाठी लागणारी महत्त्वाची फीचर TPMS देखील या कारमध्ये देण्यात आलेले आहे.
० टेक्नॉलॉजी
- आपल्याला या कारमध्ये वायरलेस चार्जिंग पर्याय दिला गेला आहे.
- याव्यतिरिक्त क्रूझ कंट्रोल चे फीचर देखील अवेलेबल करून देण्यात आले आहे.
- तसेच यामध्ये आपल्याला स्मार्ट की याबरोबरच पुश स्टार्ट/स्टॉप बटन देखील दिली गेली आहेत.
Skoda kushaq च्या ऑनिक्स वेरिएंटची वैशिष्ट्ये
स्कोडा कुशाक या कारचे ऑनिक्स नावाचे वेरिएंट आपल्याला ॲट्रॅक्टिव्ह कलर ऑप्शन्स आणि त्यासोबतच प्रीमियम क्वालिटीचे इंटेरियर आणि ऑटोमॅटिक गिअर बॉक्स साठी खूप पॉप्युलर आहे. एवढेच नाही तर त्यामध्ये आपल्याला 16 इंचाचे अलॉय विल्स अवेलेबल करून देण्यात आले आहेत . आणि या व्यतिरिक्त आपल्याला या मध्ये रियर एसी व्हेंट्स सोबतचअनेक ॲडव्हान्स फ्युचर देखील देण्यात आली आहेत.
भारतीय SUV मार्केटमध्ये स्कोडा कुशाकचे स्थान :
इंडियन मार्केटमध्ये SUV सेगमेंट मध्ये आपल्याला या कारची भरपूर क्रेझ बघायला मिळते. दिवसेंदिवस स्कोडा कुशाक ची मागणी वाढतच आहे .ही गाडी हुंडाई क्रेटा तसेच टाटा हॅरियर आणि किया सेलटॉज सारख्या नामवंत कार्सला जोरदार टक्कर देते.
Interesting facts of Skoda kushaq
० भारतीय रस्त्यांसाठी डिझाइन:
कुशाक या कारचे डिझाइन मुळातच भारतातील रस्त्यांना लक्षात घेऊन डिझाईन केले गेले आहे त्यामुळे ही कार पण इझीली खडतर रस्त्यावरून देखील चालवू शकतो .
० सुरक्षिततेसाठी 5-स्टार रेटिंग :
सेफ्टी च्या बाबतीत बोलायचं झालं तर या कारला ग्लोबल एन सी ए पी कडून फाईव्ह स्टार रेटिंग दिले गेले आहे.
० व्होक्सवॅगन ग्रुपचा प्लॅटफॉर्म:
MQB-A0-IN या प्लॅटफॉर्मवर बेस्ड असलेली ही गाडी इंडियन मार्केट साठी खास तयार करण्यात आली आहे.
Skoda kushaq: कोणासाठी योग्य आहे?
० फॅमिली कार:
कुशाकची ही गाडी आपल्याला पुरेशी स्पेस उपलब्ध करून देतेच पण त्यासोबतच तिचे सेफ्टी रेटिंगही उत्तम असल्यामुळे ही एक परफेक्ट फॅमिली कार ठरू शकते.
० प्रोफेशनल्स:
या गाडीमध्ये देण्यात आलेल्या स्मार्ट टेक्नॉलॉजी सोबतच तिच्या स्टायलिश लुक मुळे आपण प्रोफेशनल यूज साठी देखील या गाडीचा उपयोग करू शकतो.
०SUV प्रेमी:
ज्या लोकांना कारच्या चांगल्या परफॉर्मन्स सोबतच काचा लुकही क्लासी हवा असेल तर त्यांच्यासाठी या कारचा ऑप्शन अतिशय बेस्ट ठरेल.
स्कोडा कुशाक 2024 च्या लेटेस्ट व्हर्जन मध्ये कंपनीने तिचे इंजिन डिझाईन आणि टेक्नॉलॉजी मध्ये खूप सारे बदल केले त्यामुळे आधी पेक्षा अजूनच ॲडव्हान्स एसयूव्ही मार्केटमध्ये आली आहे. इंडियन एसयूव्ही मार्केटमध्ये स्कोडा कुशाकची एक वेगळीच ओळख आहे. लेटेस्ट वर्जन मध्ये स्टायलिश डिझाईन सोबतच अजून ऍडव्हान्स सेफ्टी फीचर आणि दमदार परफॉर्मन्स सोबत ही कार मार्केटमध्ये अवेलेबल आहे.
2024 Skoda kushaq चे प्रेक्षणीय बदल
MQB-A0-IN प्लॅटफॉर्म:
2024 स्कोडा कुशाक ही कार MQB-A0-IN या प्लॅटफॉर्मवर बनवली गेली. हिचे डिझाईन मुळातच इंडियन मार्केट साठी तयार केले गेले आहे ही कार आपल्याला मजबुती सोबतच सेफ्टीचीही खात्री देते.
2024 Skoda kushaq advance design
बाह्य रचना: आधुनिक आणि आकर्षक :
2024 वर्जन मध्ये आपल्याला कारचे डिझाईन मध्ये बदल झालेले दिसतात ज्यामुळे ही कार आधीपेक्षा अधिकच प्रीमियम वाटते आहे.
०आकर्षक दिसणारे क्रोम-फिनिश फ्रंट ग्रिल आपल्याला या कारमध्ये पाहायला मिळतात ज्यामुळे या गाडीला फॅन्सी टच मिळतो.
० या कारमध्ये वापरलेले ऍडव्हान्स एलईडी हेडलॅम्प्स हे पूर्वीपेक्षा अधिक प्रकाशमान वाटतात.
० तसेच या कारमध्ये देण्यात आलेली अलॉय व्हील्स मुळे या गाडीला स्पोर्टी लुक प्राप्त होतो.
इंटिरियरची लक्झरी
स्कोडा कुशाक या कारचे इंटिरियर अतिशय प्रीमियम कॉलिटी चे असून त्यामध्ये आपल्याला टेक्नॉलॉजीचा आहे तितकाच परिपूर्ण वापर केला गेला असल्याचे दिसून येते.
० नवीन सॉफ्ट-टच मटेरियल:
कारच्या डॅशबोर्ड ला आणि त्यासोबतच डोअर्सवर सॉफ्ट टच असलेले मटेरियल वापरले गेले आहे ज्यामुळे गाडीचा दर्जा आणखीनच सुधारला गेला आहे.
० एम्बिएंट लायटिंग:
या कारच्या इंटिरियर मध्ये आपल्याला एम्बिएंट लायटिंग उपयोग केला गेला आहे ज्यामुळे राईडचा अनुभव आणखीनच आनंददायी बनतो.
० सेटअप-फ्री वायरलेस चार्जिंग:
या कारमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारच्या स्मार्टफोनसाठी वायरलेस चार्जिंगचा ऑप्शन अवेलेबल करून देण्यात आलेला आहे.
ड्रायव्हिंग मोड्स
2024 च्या कुशाक मध्ये आपल्याला ड्रायव्हिंग साठी इको सोबतच नॉर्मल तसेच स्पोर्ट हे ड्रायव्हिंग मोड्स देण्यात आले आहेत. यामुळे ड्रायव्हर त्याच्या गरजेनुसार गाडीचा परफॉर्मन्स ऍडजेस्ट करू शकतो.
Skoda kushaq 2024 Price आणि वेरिएंट्स
० किंमती (एक्स-शोरूम, भारत)
-या कारची Active मॉडेल प्राईस अकरा लाख साठ हजार इतकी आहे.
- तर Ambition या मॉडेल ची किंमत साधारणपणे 13 लाख 60 हजार आहे.
- Style मॉडेल ची किंमत ही 17 लाख 50 हजार आहे.
- Monte Carlo ची किंमत वीस लाख 50 हजार आहे.
० On-road Price of Skoda kushaq : ऑन-रोड किंमत
या कालच्या ऑन रोड प्राईस ही साधारणपणे 120000 ते 22 लाखाच्या दरम्यान आहे.
याबाबत घ्या पुढील update साठी whatsapp किंवा telegram join करा.
असाच नवीन अपडेटसाठी आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा
https://chat.whatsapp.com/BiVKJ4X9Mue6xZFwMJrBUX
असाच नवीन अपडेटसाठी आमच्या Telegram ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा.
https://t.me/Automotonews_marathi
Hyundai i20 N-Line: ग्लोबल NCAP ची 5-Star Rating मिळालेली सुरक्षित कार
Maruti Ertiga 2024: स्मार्ट टेक्नोलॉजी आणि उत्कृष्ट मायलेज