Renault KWID : एक परवडणारी आणि स्टायलिश कार
आज आपण ज्या गाडी विषयी माहिती जाणून घेणार आहोत तिचं नाव आहे Renault KWID . ही अशी फोर व्हीलर आहे जी आपल्याला खिशाला परवडणाऱ्या किमतीमध्ये एक आकर्षक डिझाईन यासोबतच एक से बढकर एक असे फिचर देऊ करते.याच सगळ्या कारणांमुळे मार्केटमध्ये या गाडीचा खूप बोलबाला असलेला आपल्याला पाहायला मिळतो. छोट्या कारच्या सेगमेंटमध्ये एक सर्वोत्तम पर्याय म्हणून या गाडीचा उल्लेख प्रकर्षाने केला एवढेच नाही तर पहिल्यांदाच कार खरेदी करणाऱ्या खरेदीदारांमध्ये त्यांची फर्स्ट चॉईस ही रेनॉल्ट क्विड असते असे पाहायला मिळते.
Renault KWID चा इतिहास आणि भारतीय बाजारपेठेतील ओळख
या कारच्या स्टार्टिंग जर्नी बद्दल जाणून घेताना आपल्याला असे समजते की रेनॉल्टने क्विड ही इंडियन मार्केटमध्ये साधारणपणे 2015 रोजी लॉन्च करण्यात आली होती. त्या काळात या गाडीने रेनॉल्ट ला एका वेगळ्या लेव्हलवर नेऊन ठेवले. रेनॉल्ट साठी ही गाडी खरोखर गेम चेंजर ठरली. छोट्या कार सेगमेंट मध्ये ग्राहकांच्या गरजा पूर्ण होतील याचा विचार करूनच या गाडीला डिझाईन करण्यात आले होते. आणि त्यामुळेच ती ग्राहकांमध्ये बरीच लोकप्रिय ठरली.
० या कारच्या फर्स्ट वर्जन पासूनच क्विडने तिच्या एसयूव्ही सारख्या दिसणाऱ्या लूक मुळे लक्षवेधी ठरली.
० मुख्य गोष्ट म्हणजे कारची किंमत सर्वसामान्यांना परवडणारी आणि रिक्वायर्ड फीचर्स नियुक्त असलेली ही कार एक सर्वोत्कृष्ट निवड बनली.
भारतीय बाजारपेठेतील लोकप्रियता (Craze for Kwid) :
० या कारच्या पाच ते सहा लाख या किमतीने आणि तिच्या प्रीमियम डिझाईन सोबत देण्यात आलेल्या ऍडव्हान्स विचार मुळे इंडियन मार्केटमध्ये तिची खूप क्रेझ निर्माण झाली या गाडीमुळे भारतातील अनेक लोकांनी त्यांची फर्स्ट कार ची स्वप्नपूर्ती इंडियन मार्केटमध्ये या गाडीची एक अढळ स्थान तिने निर्माण केले.
० मध्यमवर्गीयांसाठी ही कार म्हणजे एक पर्वणी ठरली. या बजेट फ्रेंडली कार मुळे अनेक माणसाचे फोर व्हीलर खरेदी करण्याचे स्वप्ने पूर्ण झाली.
० या कारमध्ये अवेलेबल करून देण्यात आलेल्या कलर ऑप्शन्स आणि स्टायलिश डिझाईन याची भुरळ तरुणांही पडली.
आता आपण या गाडीच्या सध्याच्या म्हणजेच 2023 आणि 2024 मध्ये देण्यात आलेल्या फीचर्स ची वैशिष्ट्ये जाणून घेऊया.
Table of Contents
इंजिन आणि कामगिरी (Engine and Performance) :
2023 मध्ये जे व्हर्जन लोन झालं त्यामध्ये आपल्याला साधारणपणे 799 आणि 999 सी सी हे इंजिनचे ऑप्शन्स अवेलेबल करून देण्यात आले ..
-या कारची पॉवर 5500 RPM मध्ये 67 PS इतकी आहे
- तर कारचा टॉर्क : 91 Nm एवढा आहे
-एकर आपल्याला मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक हे दोन्ही ट्रान्समिशन चे ऑप्शन अवेलेबल करून देते. मॅन्युअल मध्ये ही कार आपल्याला फाईव्ह स्पीड मॅन्युअल चा पर्याय अवेलेबल करून देते .
-या कारचे मायलेज ही उत्तम आहे . साधारणपणे गाडी आपल्याला : 20-22 किमी/लीटर एवढे मायलेज देते. डिझाइन (Design) :
Renault KWID चा या कार बाबतची सगळ्यात मोठी अट्रॅक्टिव गोष्ट म्हणजे या कारचे डिझाईन. जे अतिशय नेत्रदीपक आहे. - या कारचा लुक आपल्याला SUV सारखा भासतो..
- तसेच 2023 च्या मॉडेलमध्ये आपल्याला या कारमध्ये नवीन DRLs देण्यात आले आहेत आणि त्यासोबत स्टायलिश LED टेललॅम्प्स चा देखील समावेश होतो.
-इतकेच नाही तर आपल्याला यामध्ये 14 इंचाचे स्टायलिश व्हील कवर्स देखील देण्यात आलेले आहेत .
इंटीरियर (Interior) :
कार मध्ये आपल्याला प्रशस्त अशी केबिन देण्यात आलेली आहे ज्यामध्ये पाच लोक अतिशय आरामदायक प्रवास करू शकतात.
- याव्यतिरिक्त आपल्याला कार मध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील पाहायला मिळते.
-या कार मध्ये आपल्याला 279-लीटर एवढी बूट स्पेस उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सुरक्षा वैशिष्ट्ये (Safety Features) :
आपल्याला असे पाहायला मिळते की Renault KWID या कारणे मुख्य फोकस हा सेफ्टी स्टॅंडर्ड वर दिला आहे. कारण या कार मध्ये आपल्याला भरभरून सेफ्टी फीचर देउ केलेले आहेत..
- यामध्ये प्रथम समावेश होतो म्हणजे एअरबॅग्जचा . या कारमध्ये आपल्याला ड्युअल फ्रंट एअरबॅग्स देण्यात आले आहेत. या एअरबॅगचा पर्याय काही ठराविक वेरियंटवर मर्यादित नाही तर तिच्या सर्व वेरिएंटमध्ये आपल्याला हा पर्याय मिळतो.
- या कार ची सेफ राईड अनुभवायला मिळावी यासाठी यामध्ये ABS आणि EBD सेफ्टी फीचर अवेलेबल करून देण्यात आले आहेत.
- तसेच इझी पार्किंग व्हावी यासाठी आपल्याला रिव्हर्स पार्किंग कॅमेरा तसेच पार्किंगची सेन्सर देखील या कारमध्ये दिलेले आहेत.
- ISOFIX सारखे चाईल्ड सेफ्टी फीचर देखील यात देण्यात आले आहेत.
2023 मधील Renault KWID व्हेरिएंट्स (Variants of Renault Kwid 2023)
० यामध्ये RXE हे बेस व्हेरिएंट आहे त्यामध्ये आपल्याला केवळ बेसिक विचार देण्यात आले आहेत.
० RXL या व्हेरियंट मध्ये बेस व्हेरिएंटच्या मानाने थोडे अधिक फीचर देण्यात आले आहेत. तुलनेत काही अतिरिक्त फीचर्ससह.
० RXT हे मिड व्हेरिएंट आहे यामध्ये आपल्याला काही प्रीमियम फीचर्स अवेलेबल करून देण्यात आले आहेत.
० (Climber) या वेरियंटमध्ये कलर कॉम्बिनेशन सोबत कारला स्पोर्टी लुक दिला गेला आहे.
कलर पर्याय (Colour Options) :
Renault KWID मध्ये आपल्याला बरेचसे कलर ऑप्शन्स अवेलेबल करून देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या आवडीनुसार कलर ऑप्शन्स निवडता येतो. कार मध्ये आपल्याला खालील कलर ऑप्शन्स मिळतात.
- फेरी रेड (Fiery Red).
- आइस कुल व्हाइट (Ice Cool White).
- मूनलाइट सिल्व्हर (Moonlight Silver).
- इलेक्ट्रिक ब्लू (Electric Blue).
- आउटबॅक ब्रॉन्झ (Outback Bronze).
Renault KWID च्या जमेच्या आणि कमकुवत बाजू (Pros and Cons) :
जमेच्या बाजू 👍🏻:
० SUV डिझाईन पासून इन्स्पायर होऊन या कारचे डिझाईन बनविण्यात आले आहे असे वाटते. तसेच या कारचा ग्राउंड क्लिअरन्स देखील हाय आहे.
० कारची किंमत ही किफायतशीर आणि परवडणारी आहे.
० तसेच या कारचे मायलेज उत्तम आहे आणि कारच्या देखभालीचा खर्च देखील खूप कमी येतो.
० कारचे इंटिरियर अतिशय स्टायलिश तर आहेच पण त्यामध्ये आपल्याला ऍडव्हान्स फीचर्स देखील दिले गेले आहेत.
कमकुवत बाजू 👎🏻 :
० या कारमध्ये दोन इंजिन ऑप्शन दिले गेले असले तरी देखील मजबूत प्रवासासाठी आपल्याला 999 सीसी इंजिन अधिक फायद्याचे ठरते.
० या कारमध्ये देण्यात आलेली बूट स्पेस ही खूप कमी असल्याची काही लोकांचे म्हणणे आहे.
० ही ५ सीटर कार असल्याने बिग फॅमिलीसाठी लिमिटेड स्पेस मिळते.
टॉप मॉडेल: Renault KWID क्लायंबर (Renault Kwid Climber)
० डिझाइन :
-रेनॉल्टच्या या मॉडेलमध्ये आपल्याला ॲट्रॅक्टिव्ह कलर कॉम्बिनेशन सोबत सिग्नेचर क्लायंबर बॅजिंग पाहायला मिळते. – या व्यतिरिक्त आपल्याला या मॉडेलमध्ये ब्लॅक आउट साइड मिरर्स यासोबतच स्पोर्टी ऑरेंज ॲक्सेंट्स मिळतात.
० अतिरिक्त फीचर्स :
- या मॉडेलमध्ये एक्स्ट्रा फीचर्स मध्ये आपल्याला रूफ रेल्स सोबतच स्पोर्टी व्हील कव्हर्स देण्यात आलेले आहेत.
- या मॉडेल मध्ये देण्यात आलेले ड्युअल-टोन इंटीरियर मला क्लासिक लुक देते.
रेनॉल्ट क्विडविषयी रोचक तथ्ये (Interesting Facts) :
० Renault KWID ही कार ज्यावेळेस इंडियामध्ये लॉन्च झाली तेव्हापासून आतापर्यंत या कारचे चार लाखापेक्षा अधिक युनिट विकल्या गेल्या आहेत.
० क्विडला परफेक्ट कार ऑफ इंडिया सारखे अनेक अवार्ड्स मिळाले आहेत.
० ही कार पहिली कार आहे जिने एसयूव्ही कडून इन्स्पायर होऊन स्वतःचा लुक बनवून एन्ट्री लेवल सेगमेंट मध्ये प्रवेश केला.
० रेनॉल्ट क्विडला ग्लोबल सेफ्टी रेटिंग मध्ये टू स्टार्स सेफ्टी रेटिंग मिळाले आहे.
तज्ज्ञांचे पुनरावलोकन (Expert Review) :
० तांत्रिक क्षमता :
Renault KWID ही सिटी कार असून ती आपल्याला चांगले मायलेज देतेच याबरोबरच तिच्या देखभालीचा खर्च देखील अतिशय किरकोळ आहे.
० ड्रायव्हिंग अनुभव :
- गाडी सिटीमध्ये आपण इझीली चालवू शकतो.
- कार मध्ये देण्यात आलेल्या हाय ग्राउंड क्लिअरन्स मुळे खराब रस्त्यांवर देखील आपण आरामदायी राईडचा अनुभव घेऊ शकतो.
० मूल्यमापन :
रेनॉल्ट क्विड ही कार की छोट्या कुटुंबांसाठी आणि फर्स्ट कार खरेदी करणाऱ्यांसाठी एक बेस्ट ऑप्शन आहे.
याबाबत घ्या पुढील update साठी whatsapp किंवा telegram join करा.
असाच नवीन अपडेटसाठी आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा
https://chat.whatsapp.com/BiVKJ4X9Mue6xZFwMJrBUX
असाच नवीन अपडेटसाठी आमच्या Telegram ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा.
https://t.me/Automotonews_marathi
MG Comet EV: 6 इनोव्हेटिव्ह फीचर्स जी बनवतात तिला खास
Porche 911: किंमत ऐकून थक्क व्हाल, ही ड्रीम कार की फक्त श्रीमंतांची ओळख?