Porche 911: किंमत, लूक आणि इतिहासाची थक्क करणारी सफर
Porche 911: एक क्रीडा कारची गोष्ट :
Porche 911 ही गाडी बरेच लोकांची ड्रीम कार आहे.जवळजवळ साधारणपणे पोर्शे 911 हिने स्वतःमध्ये म्हणजेच तिच्या डिझाईन आणि परफॉर्मन्स मध्ये सातत्याने अपडेट केलेले आहेत. चला तर मग आपण या ब्लॉग मध्ये पोर्शे 911 विषयी बऱ्याचशा गोष्टी जाणून घेऊया.
Porche 911: इतिहासाचा वेध
Porche 911 हिच्या इतिहासाबाबत बोलायचे झाल्यास ते सुरू होतो 1964 सालापासून . “
खरं सांगायचं तर 1964 रोजी जी कार लॉन्च झाली ते मॉडेल 901 हे होते परंतु यावर प्युजो कंपनीने आक्षेप घेतल्यामुळे त्या मॉडेल ला “911” म्हटले जाऊ लागले. आपल्याला पाहायला मिळते की या कारमध्ये फ्लॅट-सिक्स इंजिन रियरमध्ये बसवण्यात आलेले आहे ज्या कारणामुळे ही गाडी इतरांपेक्षा वेगळी बनते.
आजची परिस्थिती सांगायची झाल्यास आपल्याला समजते की 911 ही गाडी फक्त पोर्शेचे मॉडेल नसून तिने आता रेसिंग च्या जगात ही स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. या गाडीने ले मांज रेसिंग चॅम्पियन सारखे स्पर्धांमध्ये विक्रमी विजय मिळवले आहेत.
Porche 911 ची विविध मॉडेल्स
पोर्शे 911 ही कार आपल्याला खूप साऱ्या बिर्याणी मध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि प्रत्येक वेरियंट ची एक वेगळी खासियत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते.
| मॉडेल | वैशिष्ट्ये | किंमत (भारतामध्ये) |
|---|---|---|
| 911 करेरा | बेसिक मॉडेल, फ्लॅट-सिक्स इंजिन, परवडणारी किंमत | ₹1.84 कोटीं (सुरुवात) |
| 911 करेरा एस | उच्च परफॉर्मन्स इंजिन, 0-100 किमी/ता. फक्त 4 सेकंदांत | ₹1.99 कोटीं (सुरुवात) |
| 911 टर्बो एस | टर्बोचार्ज्ड इंजिन, 650 एचपी पॉवर, लक्झरी सुविधांनी भरलेली | ₹3.08 कोटीं (सुरुवात) |
| 911 जीटी3 आरएस | ट्रॅक-फोकस्ड कार, वजन कमी, रेसिंगसाठी तयार | ₹3.40 कोटीं (सुरुवात) |
Table of Contents
Porche 911 चे मुख्य वैशिष्ट्ये
० डिझाइन
911 मध्ये प्रत्येक जनरेशन मध्ये लेटेस्ट टेक्नॉलॉजी ऍड केलेली आपल्याला पाहायला मिळते. असे असले तरी 911 त्याचे वेगळेपण मात्र ती टिकून ठेवते. तिच्यामध्ये स्लोपिंग रूफलाईन तसेच रियर-इंजिन लेआउट याबरोबरच ड्युअल हेडलाइट्स, सारखे फिचर आजही यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
० इंजिन आणि परफॉर्मन्स
पोर्शे 911 या कारमध्ये आपल्याला असं इंजिन पाहायला मिळतं जे वजनाने अतिशय हलके पण ताकदीने मात्र तेवढेच भारी भक्कम आहे.त्याचे नाव आहे फ्लॅट सिक्स इंजिन.911 ही गाडी 650 हॉर्स पावर निर्माण करते. तर हिचे जीटी3 आरएस मॉडेल हे मॉडेल साधारणपणे शंभर किलोमीटर प्रतितास या वेगाने काम करते.
० ट्रान्समिशन टेक्नोलॉजी
911 या कार मध्ये आपल्याला ड्युअल क्लच ट्रान्समिशन पाहायला मिळतं जे ८स्पीड पीडीके आहे. या ट्रान्समिशनमुळे आपल्याला गिअर शिफ्टिंग फास्ट करता येतो. यासोबतच त्यांनी आपल्याला मॅन्युअल ट्रान्समिशन चा ऑप्शन देखील काही वेरियंटमध्ये अवेलेबल करून दिला आहे.
० ड्रायव्हिंग अनुभव
911 मध्ये या कारमध्ये आपल्याला काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर केलेला दिसतो त्यामध्ये रिअर व्हील स्टीयरिंग त्याचबरोबर अडपटिव्ह सस्पेन्शन सारख्या फीचरमुळे आपल्याला एक प्रीमियम राईडचा अनुभव मिळतो.
पोर्शे 911 मध्ये आपल्याला काय आवडते?
० उच्च दर्जाचा परफॉर्मन्स:
911 ही गाडी अतिशय फास्ट रेसिंग सोबतच कंट्रोल आणि स्टॅबिलिटी चा आपल्याला अनुभव देते. तिच्या या हाय क्वालिटी परफॉर्मन्स चीच क्रेझ खरेदीदारांमध्ये आहे.
० क्लासिक आणि मॉडर्न यांचे मिश्रण:
याची एक गाडी आहे जिच्या डिझाईन आणि परफॉर्मन्स मध्ये सतत अपडेट होऊन देखील ती स्वतःचे वेगळेपण जपत आहे. यामुळे तिच्यामध्ये कितीही फ्युचरिस्ट्रीक् टच दिला गेला तरी ती तिची ओळख जपते. .
० उत्कृष्ट रिटेन्शन व्हॅल्यू :
911 ही गाडी इतर रेसिंग कार च्या तुलने स्वतःची किंमत टिकून ठेवते असे आपल्याला पाहायला मिळते.
Porche 911 मध्ये सुधारणा आवश्यक गोष्टी
० किंमत:
इंडियन मार्केटमध्ये पाहायला गेल्यास आपल्याला पोर्शे 911 ही गाडी अतिशय एक्स्पेन्सिव्ह वाटू शकते कारण इंडियन मार्केटमध्ये या गाडीची स्टार्टिंग प्राईस अंदाजे ₹1.84 कोटी इतकी आहे .
० प्रॅक्टिकल उपयोगिता कमी:
प्रॅक्टिकली विचार केला तर ही गाडी फॅमिली कारण असून ती फक्त टू सीटर कार आहे त्यामुळे आपल्या साठी ती तितकीशी व्यावहारिक ठरत नाही.
० रखरखीत रस्त्यांवर त्रासदायक:
Porche 911 ही गाडी भारतीय रस्त्यांवर चालवण्यासाठी बनवली गेली नसल्याने खराब रस्त्यांवर या गाडीने प्रवास करणे खरच त्रास नाही होऊ शकते.
पोर्शे 911 चे प्रतिस्पर्धी
० Audi R8
-ही कार पोर्शे 911 ला V10 इंजिन तसेच क्वाट्रो ऑल-व्हील ड्राइव्ह मी किमती मध्ये टक्कर देत असली तरी देखील या कारला कोणताही क्लासिक वारसा लाभलेला नसल्याचे आपल्याला पाहायला मिळते.
० Mercedes AMG GT
-तिच्या बेस्ट डिझाईन आणि लक्झरी एक्सपिरीयन्स देत पोर्शे 911मागे टाकत असली तरी देखील या गाडीचे टर्निंग प्रिसिजन पोर्शे 911 पेक्षा अतिशय कमी आहे .
० Chevrolet Corvette C8
- ही गाडी आपल्याला किफायतशीर किमतीत सुपर कार परफॉर्मन्स देत असली तरी देखील या गाडीला युरोपियन कार एवढी प्रतिष्ठा नाहीये.
पोर्शे 911 चे अद्वितीय वैशिष्ट्ये
० रिअर व्हील स्टीयरिंग:
पोर्शे 911 या गाडीमध्ये मागच्या चाकाला आपल्याला काही डिग्री मध्ये वळण्याचा ऑप्शन येतो आपल्याला वळणांच्या रस्त्यावर अतिशय उपयोगी पडतो याचे कारण असे आपण अतिशय सोयीस्करपणे गाडी कंट्रोल करू शकतो.
० ड्युअल टर्बो तंत्रज्ञान:
या कारच्या टर्बो एस मॉडेल मध्ये आपल्याला टर्बो टेक्नॉलॉजी मिळते त्यामुळे आपण फास्ट राईड चा अनुभव घेतो.
० कस्टमायझेशन:
पोर्शे 911 ही गाडी तिच्या ग्राहकांसाठी अनेक कस्टमाईझेशन चे ऑप्शन अवेलेबल करून देते.
मनोरंजक तथ्ये
० Porche 911 ही कार अतिशय जुनी रेसिंग कार आहे जी आजही मार्केटमध्ये अवेलेबल आहे ती स्वतःमध्ये सतत अपडेट करत असल्यामुळे मार्केटमध्ये तीची क्रेझ अजूनही कायम आहे.
० Porche 911 या गाडीचे इंजिन हे तिच्या मागील बाजूस असल्या कारणामुळे तिचे वजन योग्यरित्या बॅलेन्स झाल्यामुळे आपल्याला उत्कृष्ट परफॉर्मन्स मिळतो.
० 911 कार ची डिझाईन ची आयडिया ही एका फेमस बियर बॉटल पासून घेण्यात आलेली आहे.
० “911” हा नंबर पोर्शेला लकी ठरल्याचे आपल्याला जाणवते.
Porche 911 शिकार फक्त एक रेसिंग कार नाहीये तर ऑटोमोबाईल इंडस्ट्री मध्ये ती एक आयकॉन म्हणली जाते असं म्हणायला हरकत नाही. या गाडीचा इतिहास आणि तिचा परफॉर्मन्स त्याच बरोबर काळानुसार तिच्या डिझाईन मध्ये करण्यात येणारे बदल तसेच टेक्नॉलॉजीचा तिच्यामध्ये केलेला उपयोग यामुळे ती इंटरनॅशनल लेवल ला नंबर वन वर आहे. जरी तिची किंमत एक्सप्रेस आणि प्रॅक्टिकली आपण तिचा वापर फॅमिली कार म्हणून करू शकत नसलो तरी देखील परफॉर्मन्स प्रेमींसाठी साठी मात्र ही एक उत्कृष्ट निवड ठरेल. हे निश्चित.
जर तुम्ही एक कॉलिटी ड्रायव्हिंग राईड चा अनुभव घ्यावी इच्छिता आणि त्यासोबतच लक्झरी फील ही तुम्हाला हवा असल्यास. पोर्शे 911 तुम्हाला कधीही नाराज करणार नाही
० उच्च दर्जाचे साहित्य
-या कारच्या करियर मध्ये आपल्याला पाहायला मिळते की नप्पा लेदर यासोबत अल्कंटारा फिनिश, तसेच कार्बन फायबर डिटेल्स चा उपयोग केला गेला आहे.
-या कारच्या प्रत्येक सीटला आपल्याला व्हेंटिलेशन तसंच पोर्टेबल हीटिंग चे पर्याय दिले गेले आहेत जे आपल्या प्रवासाला आरामदायी बनवायला मदत करतात.
० लो स्लंग फ्रंट डिझाइन:
या फीचर चा उपयोग वाऱ्याचा ती काय कमी करण्यासाठी 911 हार मध्ये फ्रंट साईड ची हाईट कमी ठेवण्यात आली आहे.
पोर्शे 911 vs प्रतिस्पर्धी (परफॉर्मन्स तुलना)
| मॉडेल | 0-100 किमी/ता. (सेकंद) | सर्वाधिक वेग (किमी/ता.) | पॉवर (एचपी) | किंमत (भारतात) |
|---|---|---|---|---|
| Porche 911 टर्बो एस | 2.7 | 330 | 650 | ₹3.08 कोटीं |
| Audi R8 | 3.1 | 330 | 620 | ₹2.72 कोटीं |
| Mercedes AMG GT | 3.5 | 310 | 557 | ₹2.63 कोटीं |
| Chevrolet Corvette C8 | 3.3 | 312 | 495 | ₹1.50 कोटीं |
या कार बाबतीत तसेच येणार्या आगामी कारचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी
आजच whatsapp group ला जॉईन व्हा.
याबाबत घ्या पुढील update साठी whatsapp किंवा telegram join करा.
असाच नवीन अपडेटसाठी आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा
https://chat.whatsapp.com/BiVKJ4X9Mue6xZFwMJrBUX
असाच नवीन अपडेटसाठी आमच्या Telegram ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा.
https://t.me/Automotonews_marathi
Hyundai Venue: 10 रंजक गोष्टी जी तुम्हाला आश्चर्यचकित करतील
Hyundai Verna का तुमच्यासाठी सर्वोत्तम सेडान आहे ? टॉप 10 कारणे