Maruti Suzuki Fronx 2024 खरेदी कशी फायदेशीर ठरू शकते

Maruti Suzuki fronx बद्दल संक्षिप्त माहिती पाहा ह्या ब्लॉग मधे

तुम्ही देखील घरी बलेनो आणण्याच्या विचाराने जर मारुती डीलरशिपवर गेलात, तर तुम्ही त्या ऐवजी फ्रॉन्क्स च घरी घेऊन येणार कारण फ्रॉन्क्स ती पाहताक्षणी लक्षवेधून घेणारी व मोहक वाटते. त्यामुळे तुम्ही फ्रॉन्क्स नक्कीच विचार करा मला तर मग जाणून घेऊयात एवढं काय आहे या मारुतीच्या नवीन मॉडेलमध्ये जिचे नाव आहे मारुती सुझुकी फ्रॉन्क्स . यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचल्याची नक्की खात्री करा कारण यामध्ये आपण या कार बद्दल सर्व डिटेल माहिती जाणून घेणार आहोत.

Maruti Suzuki Fronx वैशिष्ट्ये :

इंजिन आणि परफॉर्मन्स :

मुख्य तपशील मारुती फ्रॉन्स मध्ये असलेल्या डिटेल्स वर नजर टाकूयात
या कारचे इंजिन 998 सीसी – 1197 सीसी इतके आहे
कारची पॉवर ही 76.43 – 98.69 bhp इतकी असून कारचा
टॉर्क 98.5 Nm – 147.6 Nm इतका आहे. या कारमध्ये आपल्याला पाच सीट्स ची सीट कॅपॅसिटी आहे . या कारचा
ड्राइव्ह प्रकार हा FWD टाईप चा आहे तसेच या गाडीचे मायलेज 20.01 – 22.89 kmpl आहे ही कार ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल देखील प्रोव्हाइड करते तसेच या कार मध्ये आपल्याला पार्किंग सेन्सर ऍडव्हान्स इंटरनेट फॅसिलिटी मागील
एसी व्हेंट्स तसेच क्रूज कंट्रोल थ्री सिक्सटी डिग्री कॅमेरा देखील देण्यात आला आहे

Maruti Suzuki Fronx बद्दलची लेटेस्ट अपडेट्स

Maruti Suzuki fronx ही 2023 ला लॉन्च करण्यात आली होती आणि याबद्दल सांगायची महत्त्वाची गोष्ट अशी की लॉन्च झाल्या पासून हिने चक्क दोन लाख युनिट विक्रीचा उच्चांक गाठला आहे तसेच क्रॉसोवरचे काही शेवटचे शिल्लक राहिलेले युनिट फक्त सात महिन्यात विकले गेले असे समजले आहे आणि तुम्ही नोव्हेंबर मध्ये मारुती फ्रॉन्क्स खरेदीच्या विचारात असाल तर तुम्हाला पन्नास हजार रुपये पर्यंत डिस्काउंट मिळू शकणार आहे

Maruti suzuki fronx price

मारुती फ्रॉन्क्सची किंमत जवळजवळ 7.52 लाख ते 13.04 लाख रुपये या दरम्यान असण्याची शक्यता आहे कारण प्रत्येक शहरानुसार तिच्या किंमतीमध्ये थोडाफार फरक पडतो .

Maruti Suzuki Fronx EV मध्ये देखील लॉनच होणार आहे आणि त्याचे इलेक्ट्रिक वर्जन लवकरच भारतीय बाजापेठेमध्ये उपलब्ध होईल :

Maruti Suzuki Fronx प्रकार :

मारुती फ्रॉन्क्स चे आपल्याला मार्केटमध्ये सहा वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. यामध्ये.सिग्मा, डेल्टा, डेल्टा+, डेल्टा+ (ओ), झेटा आणि अल्फा यांचा समावेश आहे. परंतु आपल्याला सीएनजी पॉवरट्रेन चा ऑप्शन हा फक्त सिग्मा आणि डेल्टा या मारुती सुझुकी फ्रॉन्क्सच्या प्रकारामध्येच अवेलेबल करून दिला आहे.

या कार मधील सीटिंग कॅपॅसिटी बद्दल बोलायचे झाल्यास ही फाईव्ह सीटर लेआउट आपल्याला देते.

Maruti Suzuki fronx colour Options:

आता आपण पाहूयात मारुती सुझुकी फ्रॉन्क्स हे आपल्याला कोणकोणत्या कलर ऑप्शन्स मध्ये अवेलेबल करून देण्यात आले आहे चला तर मग ते पाहूया .
यामध्ये आपल्याला जवळजवळ सात मोनोटोन आणि तीन ड्युअल-टोन रंगांमध्ये कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात ज्यामध्ये नेक्सा ब्लू, अर्थेन ब्राउन, तसेच आर्क्टिक व्हाइट, ऑप्युलंट रेड, ग्रँड्यूअर ग्रे, आणि ब्लूश ब्लॅक, स्प्लिंडिड सिल्व्हर, ब्लूश-ब्लॅक रूफसह मातीचा तपकिरी, ब्लॅक रूफसह ऑप्युलंट रेड , आणि निळसर-काळ्या छतासह सिल्वर असे कलर कॉम्बिनेशन अवेलेबल करून देण्यात आले आहेत

मारुती सुझुकी फ्रॉन्क्स बूट स्पेस:

आता आपण या कारमधील बूट स्पेस बद्दल माहिती करून घेऊयात तर ऐका या कार मध्ये आपल्याला 308 लीटरची बूट स्पेस देते.

Maruti Suzuki fronx इंजिन आणि ट्रान्समिशन:
मारुतीने तिच्या या व्हर्जनमध्ये फ्रॉन्क्सला दोन इंजिन ऑप्शन्स अवेलेबल करून दिले आहेत जे आपण डिटेल मध्ये जाणून घेऊया

पहिले म्हणजे 1-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन (100 PS/148 Nm) देण्यात आले आहे जे माइल्ड हायब्रीड टेक्नॉलॉजी सोबत येते. त्याप्रमाणेच यामध्ये आपल्याला फाईव्ह स्पीड मॅन्युअल किंवा सिक्स स्पीड ऑटोमिक ट्रांजेक्शन देखील कनेक्ट असल्याचे समजते.

दुसरे म्हणजे1.2-लिटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन (90 PS/113 Nm), जे 5-स्पीड मॅन्युअल किंवा 5-स्पीड AMT या ऑप्शनसह मार्केटमध्ये अवेलेबल आहे.

CNG प्रकारांमध्ये साधारणतः 1.2-लिटर इंजिनच वापरतात, जे 77.5 PS आणि 98.5 Nm निर्मिती करते आणि 5-स्पीड मॅन्युअल सोबत जोडलेले असते.

Maruti Suzuki fronx fuel efficiency :

० 1-लिटर MT: 21.5 kmpl

० 1-लिटर AT: 20.1 kmpl

० 1.2-लिटर MT: 21.79 kmpl

० 1.2-लिटर AMT: 22.89 kmpl

०1.2-लिटर सीएनजी: 28.51 kmpl

Maruti Suzuki fronx features ची वैशिष्ट्ये:

बोर्डवरील इन फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर आपल्याला वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay देण्यात आलेला आहे आणि यासोबत 9-इंच चा इन्फोटेनमेंट सिस्टम सुधा दिलालेला आहे, तसेच हेड-अप डिस्प्ले, क्रूझ कंट्रोल आणि ऑटो क्लायमेट कंट्रोल सारख्या फीचर्सची आपल्याला या कारमध्ये पाहायला मिळेल .

Maruti Suzuki fronx

Maruti suzuki fronx safety rating :

सुरक्षिततेच्या बाबतीत बोलायचं झालं तर मारुती सुझुकी फ्रॉन्क्समध्ये आपल्याला सहा एअरबॅग्ज अवेलेबल करून दिले आहेत त्याबरोबरच, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम(ESP), आणि हिल-होल्ड असिस्ट, सोबतच 360-डिग्री कॅमेरा आणि ISOFIX चाइल्ड सीट अँकर देखील देण्यात आले आहेत. सेफ्टीच्या दृष्टीने गरजेचे असलेली फीचर्स आपल्याला यामध्ये अवेलेबल आहेत.

Maruti Suzuki fronx competitors चे प्रतिस्पर्धी:

अशा कोणत्या कार्स आहेत ज्या मारुतीच्या या मॉड्युलला टक्कर देऊ शकतात ते बघुयात. तसं पाहायला गेले तर मारुती फ्रॉन्क्सचा तोला मोलाचा एकमेव थेट दुश्मन (प्रतिस्पर्धी ) आहे त्याचे नाव टोयोटा अर्बन क्रूझर टायसर. त्याप्रमाणेच असे सांगितले जाते की, Kia Sonet, Hyundai Venue, तसेच Tata Nexon, Mahindra XUV 3XO, व Renault Kiger, Nissan Magnite, आणि Maruti Brezza, तसेच Citroen C3 आणि Hyundai Exter सारख्या सबकॉम्पॅक्ट SUV चा ऑप्शन आपल्याला मार्केटमध्ये मिळतो.

मारुती सुझुकी FRONX बाबतीत तज्ञांचे मत :
मारुती सुझुकी फ्रॉन्क्स बद्दल सांगायचे झाले तर येतीसे उत्तम कार आहे जिच्यामध्ये आपल्याला चुका काढणे अतिशय कठीण ठरेल कारण यामध्ये आपल्याला आवडण्यासारखे अशी बरीच फीचर्स देण्यात आले आहेत आणि त्या मानाने दोष खूप कमी आहे. किंवा नसल्या तर जमा आहेत. ही कार म्हणजे प्रीमियम हॅचबॅक तसेच, सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही आणि कॉम्पॅक्ट एसयूव्ही यांचे मिश्रणच म्हणता येऊ शकते.

मारुती सुझुकी फ्रॉन्क्स एक्सटेरियर बाह्यरूप :

फ्रॉन्क्स ला बेलोना पेक्षा वेगळा लूक देऊन मारुतीने एक क्लासिक मॉडेल मार्केटमध्ये आणून चांगले काम केले आहे मारुतीने फ्रॉन्क्सला बॅलेनोपेक्षा पूर्णपणे वेगळे दिसणे ही एक चांगली सुरुवात आहे. चांगली सुरुवात झाली आहे.
यामध्ये दिवसा चालणारे दिवे आणि बम्परवर ठेवलेल्या फुल-एलईडी हेडलॅम्पमधील गोष्टींसोबतच तिचं फेस हे आपल्याला ग्रँड विटाराच्या स्केल-डाउन वर्जन सारखं असल्याचे भासते. तसेच अजून एक गोष्ट लक्षात आली आहे की यामध्ये DRL वर खालचे प्रकार गायब करून त्यांना बेसिक प्रोजेक्टर हेड लॅम्प ने रिप्लेस केले आहे

मारुती सुझुकी FRONX सेफ्टी ‌ ची.सुरक्षितता :

आता पण जाणून घेऊयात याच्यामध्ये सेफ्टी फीचर्स किती आहेत व कोणकोणते आहेत याची माहिती सविस्तर पणे तर यामध्ये असलेल्या सेफ्टी किटमध्ये आपल्याला ड्युअल एअरबॅग्ज, सोबतच EBD सह ABS, यांसारख्या तसेच इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि स्टॅंडर्ड म्हणून हिल असिस्ट देखील देण्यात येतो . टॉप दोन ट्रिम्सना एक्सट्रा साइट्स आणि कर्टन मिळतातएकूण यामध्ये आपल्याला सहा एअर बॅग मिळतात. अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे फ्रॉन्क्स सुझुकीच्या हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर बेस्ड आहे जे ग्लोबल NCAP द्वारे देण्यात येणाऱ्या क्रॅश टेस्टमध्ये साधारण मिडीयम रेटिंग मिळवते

मारुती सुझुकी FRONX चे फायदे आणि तोटे :

आम्हाला आवडलेल्या गोष्टी :

० पहिली गोष्ट म्हणजे तिची मस्क्यूलर स्टाइल जी आपले लक्ष तिच्याकडे वेधून घेते आणि ती दिसायला अगदी बेबी SUV आहे ज्यामुळे तिचा लोक क्युट वाटतो.
० दुसरी गोष्ट म्हणजे यामानाने हि कार अगदी प्रशस्त आणि व्यावहारिक अशी केबिन आपल्याला अवेलेबल करून देते जी लहान कुटुंबासाठी अगदी सोयीस्कर बनते.
० तिसरी गोष्ट म्हणजे यामध्ये दिलेल्या दोन्ही इंजिन ऑप्शन सोबतच ती ऑटोमॅटिक ऑप्शन आपल्याला देते.
० आणि मुख्य म्हणजे आपल्याला लागणाऱ्या मूलभूत गोष्टी देखील यामध्ये देण्यात आले आहेत ज्यामध्ये विशेषतः समावेश होतो तो म्हणजे : 9-इंच टचस्क्रीन, आणि हवामान नियंत्रण, तसेच क्रूझ नियंत्रण या गोष्टींचा.

या गोष्टीमुळे ही कार आपल्याला नाराज करते :

० पहिली गोष्ट म्हणजे स्लोपिंग रूफलाईन ही मागील सीट हेडरूममध्ये खातो.
० दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला या कारमध्ये डिझेल इंजिन ऑप्शन अवेलेबल नाही जो‌ Nexon आणि Sonet सारख्या कार या हा ऑप्शन आपल्याला उपलब्ध करून देतात.
० तिसरी गोष्ट म्हणजे कार मध्ये असायलाच हवे असे वाटणारे सगळ्यात आवडते फीचर म्हणजे : सनरूफ, हे यात मिळत नाही .

हे सगळं जरी खरं असले तरी आपल्याला हवे असणारे लक्झरी फीचर्स जरी फ्रॉन्क्स नसली तरी ती आपल्या‌ बेसिक गरजा नक्कीच पूर्ण करते.

फ्रॉन्क्स मध्ये ड्रायव्हरच्या सीटवरून, आपल्याला क्लिअर विजीबिलिटी मिळते आणि जर ही तुमची पहिली कार असेल तर तुम्ही नक्कीच बेलेनो ऐवजी फ्रॉन्क्स निवड कराल.

याबाबत घ्या पुढील update साठी whatsapp किंवा telegram join करा.

असाच नवीन अपडेटसाठी आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा

https://chat.whatsapp.com/BiVKJ4X9Mue6xZFwMJrBUX

असाच नवीन अपडेटसाठी आमच्या Telegram ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा.

https://t.me/Automotonews_marathi

MG Windsor EV 13.5 लाखांत Vs टाटा Harrier पेक्षा स्पेस जास्त, पण आणखी काय आहे खास

Leave a Comment