Mahindra Thar Roxx : SUV सेगमेंटमध्ये नवा क्रांतिकारक बदल
आज आपण या ब्लॉग मध्ये एक अशा गाडी विषयी माहिती जाणून घेणार आहोत जिने काही कालावधीतच मार्केटमध्ये स्वतःची भयंकर क्रेझ निर्माण केली. जी ऑफ रोड साठी तर सुपर बेस्ट ऑप्शन आहे. ती फोर व्हीलर आहे,
महिंद्रा थार रॉक्स ही गाडी म्हणजे एसयूव्ही सेगमेंट मधील कोहिनूर हिराच म्हणायला हरकत नाही. असे म्हणण्या मागचे कारण म्हणजे या गाडीचे दमदार इंजिन यासोबतच कितीही मोठा अडथळ्यांवर मात करण्याची या गाडीमध्ये असलेली कॅपॅसिटी एवढेच नाही तर दिसायलाही कार अतिशय आकर्षक डिझाईन मध्ये आहे.
आणि ही गाडी आपल्याला ऑफ रोड राईड चा जबरदस्त अनुभव देण्यासाठी सज्ज आहे. ही गाडी ग्राहकांच्या पसंतीस पडत आहे. ग्राहकांमध्ये या गाडी विषयी एक वेगळीच क्रेज निर्माण झाली आहे या कारणामुळे 2024 मध्ये महिंद्राने तिचे लेटेस्ट मार्केटमध्ये लॉन्च केले ज्याचं नाव आहे ” थार रॉक्स” ही एसयूव्ही सेगमेंट मध्ये लॉन्च करून मार्केटमध्ये ग्राहकांना अनोखा सरप्राईज दिले आहे.
Mahindra Thar चा इतिहास
या गाडीची सुरुवात झाली 1949 पासून ज्या काळी महिंद्राने अमेरिकन जिप चा लायसन टेक्नॉलॉजी भारतात आणली.खरंतर ही गाडी आर्मी वाल्यांसाठी बनवण्यात आली होती. असं असलं तरी देखील नंतर तिचा उपयोग शेतकरी तसेच व्यापारी आणि ऑफराइड राईड साठी उत्सुक असलेले लोक देखील करू लागले. हे लक्षात घेऊन महिंद्रा ने 2010 मध्ये पहिली थार लॉन्च केली. यामध्ये महिंद्रा ने ऍडव्हान्स फीचर्स ऍड केले. आणि यात कारचा लूकही अतिशय क्लासी दिसत होता. या कारणांमुळेच थारची प्रचंड क्रेज मार्केटमध्ये निर्माण झाली. एसयूव्ही सेगमेंट मध्ये तिने एक वेगळेच स्थान निर्माण केले.
Mahindra thar roxx चे फीचर्स
०.डिझाइन आणि स्टाइल
थार ने एस यु व्ही सेगमेंट मध्ये भरपूर ऍडव्हान्स फीचर्स ऍड केले आहेत. या गाडीचा हाय ग्राउंड क्लिअरन्स अतिशय उत्तम आहे. या गाडीचे बॉडी स्ट्रक्चर आणि ओव्हर ऑल एक्सटेरियर अतिशय मजबूत वाटते यामुळे ही गाडी ऑन रोड असो किंवा ऑफरोड दोन्ही ठिकाणी उत्तम राईड चा अनुभव देते.
० इंजिन आणि परफॉर्मन्स
आता आपण थार मध्ये असलेल्या इंजिन आणि तिच्या परफॉर्मन्स बद्दल जाणून घेऊयात. आपल्याला था रॉक्स मध्ये टर्बो पेट्रोल तसंच डिझेल इंजिन चा पर्याय देखील उपलब्ध आहे .या दोन्ही इंजिन आपल्याला उत्कृष्ट आणि दमदार इंजिन परफॉर्मन्स देतात तसेच यामध्ये 6-स्पीड ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल गिअर बॉक्स चा ऑप्शन देखील अवेलेबल करून देण्यात आला आहे.
० मायलेज
ही आपल्याला अंदाजे 15 kmpl मायलेज देते पेट्रोलमध्ये आणि डिझेलमध्ये साधारणपणे 18 kmpl मायलेज देते.
० फीचर्स
-या गाडीमध्ये आपल्याला अॅडव्हान्स टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम चा ऑप्शन अवेलेबल करून देण्यात आला आहे.
- ॲडव्हान्स विचार सोबतच आपल्याला यामध्ये क्रूझ कंट्रोल देखील ऍड केलेले दिसते.
- एवढेच नाही तर ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल देखील देण्यात आला आहे.
- या गाडीमध्ये आपल्याला 4×4 ड्राईव्ह मोड देण्यात आला आहे
- सेफ्टी फीचर्स मध्ये आपल्याला ही गाडी ABS, आणि EBD, तसेच आणि 6 एअरबॅग्ससह अवेलेबल करून देते.
Contents
Mahindra Thar Roxx ची Price
० एक्स-शोरूम किंमत
या गाडीची किंमत ही तिच्या व्हेरियंट नुसार बदलते.
या गाडीच्या पेट्रोल व्हेरियंट ची किंमत साधारणपणे साडेबारा लाख पासून सुरू होते तर हिच्या डिझेल व्हेरियंटची स्टार्टिंग प्राईस साडेचौदा लाख आहे
० ऑन-रोड किंमत
या गाडीची ऑन रोड किंमत जवळपास 17 लाखांपर्यंत जाते. सिटी नुसार किमतीमध्ये थोडा अधिक फरक होऊ शकतो. ऑन रोड किमतीमध्ये आरटीओ शुल्क तसेच टॅक्स आणि इन्शुरन्स ची रक्कम ऍड होत असते.
Thar Roxx 5 Door :
महिंद्रा थार रॉक्स आता मार्केटमध्ये नव्या रूपात लॉन्च होणार सूत्रांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला समजते की ही गाडी आता तिच्या फाईव्ह डोअर वर्जन मध्ये मार्केटमध्ये उतरणार आहे. महिंद्राच थार चे हे व्हर्जन बिग फॅमिली साठी बेस्ट ऑप्शन असणार आहे कारण यामध्ये आपल्याला भरपूर स्पेस मिळणार आहे त्यासोबतच अनेक नवीन फिचर्स देखील यामध्ये अवेलेबल करून देणार आहेत. तसेच यामध्ये ऑफ लोडिंग कॅपॅसिटी देखील आधीपेक्षा भरपूर असणार आहे
Mahindra Thar Roxx बुकिंग आणि अवेलेबिलिटी
तुम्ही ही गाडी बुक करण्यासाठी डायरेक्ट महिंद्राच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन महिंद्रा थार रॉक्स बुक करू शकता .यासाठी तुम्हाला फक्त गरज आहे ती केवळ तुमची फेवरेट व्हेरिएंट निवडायची . त्यानंतर तुम्ही साधारणपणे 25 हजारापासून ते 50000 बुकिंग अमाऊंट भरून गाडी बुक करू शकता.
० शोरूममध्ये बुकिंग
तुम्हाला जर ऑफलाइन गाडीचे बुकिंग करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या शहराच्या जवळ असलेल्या महिंद्रा डीलरशिप कडे जाऊन गाडी चे मॉडेल प्रत्यक्षात पाहून तुम्ही ती बुक करू शकता.
Mahindra Thar Roxx च्या इंटरेस्टिंग गोष्टी
० महिंद्रा थार ला मिळालेला लष्करी वारसा अनोखा आहे.
० या महिंद्रा थारला ऑफ रोडचा किंग बोलले जाते आणि हे त्यांनी सिद्ध देखील करून दाखवले आहे. थार ने अनेक ऑफ रोडींग कॉम्पिटिशन मध्ये जिंकून स्वतःला अव्वल ठरवले आहे.
० अनेक बॉलीवुड मूवी मध्ये आपण थार पाहिली आहे. त्यामुळे थारला सेलिब्रिटी एसयूव्ही म्हणूनही ओळखतात.
० थारची जर्नी आणि तिचा क्लासिक लुक देण्यात आलेले ॲडव्हान्स एसयूव्ही फीचर यांचे मिश्रण तिला एक सुंदर टच देतात.
Mahindra Thar Roxx SUV का निवडावी?
० दमदार परफॉर्मन्स
ही गाडी खास करून ऑफरोड साठी तयार करण्यात आली आहे. ती तिच्या इंजिनच्या क्षमतेवरती कितीही खडतर जमिनीवरती रस्ता काढू शकते . कितीही अडथळे निर्माण झाले तरीही ती त्यातून मार्ग काढते. मग ते चढउतारा असो किंवा चिखल खडबडीत रस्ता ती ते सहज पार करते.
Mahindra Thar Roxx ची खास वैशिष्ट्ये
महिंद्रा थार रॉक्स ही गाडी अनेक लेटेस्ट फीचर्स सोबत लॉन्च करण्यात येणार आहे. एक गाडी स्टाईल परफॉर्मन्स आणि आराम या तिन्हीचा समतोल आहे.
.
० 4×4 असलेली ही गाडी आपल्याला जबरदस्त ऑफ रोडिंग राइडचा अनुभव देते. या गाडीमध्ये देण्यात आलेले लो रेंज गिअरबॉक्स तसेच इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम हे तिला खडतर रस्त्यावरून जाताना देखील तिची पकड स्टेबल राहावी यासाठी मदत करतात.
० नवीन डिझाइन
थार रॉक्सला उत्कृष्ट डिझाईन देण्यात आले आहे. या गाडीच्या डिझाईन मध्ये आपल्याला एक मस्कुलर टच असलेला जाणवतो. या गाडीला फ्रंट ग्रील यासोबतच LED DRLs आणि स्ट्रॉंग असे 18 इंचाचे अलॉय व्हील्स तिच्या स्टायलिश लुक मध्ये भर घालतात.
० इंटिरियर्स आणि तंत्रज्ञान
गाडीचे एक्सटेरियर बद्दल माहिती घेतली आता आपण बघुयात की आत मध्ये आपल्याला कोणते कोणते फीचर्स देण्यात आले आहेत . गाडीमध्ये आपल्याला इन्फोटेनमेंट सिस्टीम अवेलेबल करून देण्यात आली आहे.जी टच स्क्रीन आहे. गाडीचे इंटिरियर अतिशय प्रीमियम वाइब देतात. आपल्याला या गाडीमध्ये वॉटरप्रूफ सीट्स मिळतात. याव्यतिरिक्त ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल सारखे फिचर देखील यामध्ये देण्यात आले आहेत.
० सुरक्षा वैशिष्ट्ये
थार रॉक्समध्ये आपल्याला भरपूर सेफ्टी फीचर्स देखील देण्यात आले आहेत त्याच्यामध्ये समावेश तो म्हणजे ड्युअल एअरबॅग्स, आणि ABS, तसेच इझी पार्किंग साठी आपल्याला रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, अवेलेबल करून देण्यात आले आहेत आणि क्रॅश-टेस्टमध्ये या गाडीने 4-स्टार रेटिंग प्राप्त केले आहे.
Mahindra Thar Roxx चे स्पर्धक
इंडियन मार्केट मध्ये देखील महिंद्रा थार रॉक्सचे अनेक स्पर्धक आहेत. परंतु प्रामुख्याने टक्कर देते ती म्हणजे मारुती चिमणी
मारुती जिम्नी:
जिम्नी ही गाडी छोटी SUV आहे दिसला ही मिनी थार सारखेच वाटते परंतु ही गाडी धारच्या तुलनेत तितकीशी ताकदवान नाही.
थार रॉक्सच्या देण्यात आलेल्या अनबिलेवेबल फीचर्स मुळे प्रेमींसाठी तीच बेस्ट ऑप्शन ठरते.
Thar Roxx बाबत आवडलेल्या गोष्टी 👍🏻
० दमदार परफॉर्मन्स
खडबडीत रस्ता रस्ता असू देत किंवा चिखल असू देत, डोंगराळ रस्ता असू देत किंवा मग वाळवंट ही गाडी सगळ्या अडथळ्यातून सहज मार्ग काढते.
०डिझाइन आणि स्टाईल:
थार रॉक्सचे हिचा लुक एकदम स्टायलिश आहे सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो.
० मल्टीपर्पज उपयोग:
ऑफ-रोडिंगसाठी तरीही गाडी बेस्ट ऑप्शन आहेच पण यासोबतच फॅमिली सोबत ट्रॅव्हल करायला देखील या गाडीचा पर्याय योग्य ठरतो.
० पुनर्विक्री किंमत:
महिंद्रा थारला आपल्याला पुनर्विक्री किंमत देखील चांगली मिळते .
Mahindra Thar Roxx एक खासियत
थार रॉक्स ही गाडी इतकी ग्राहकांच्या इतकी आवडीची झाली आहे ग्राहकांमध्ये तिची एवढी क्रेझ निर्माण झाली आहे त्यामुळे ही केवळ गाडी राहिली नाही तर तिचे ग्राहकांसोबत एक कनेक्शन निर्माण झाले आहे. ऑफ रोडींग मध्ये तिचं पावरफुल इंजिन आणि लक्ष वेधून घेणारे डिझाईन यामुळे ही गाडी एसयूव्ही प्रेमींसाठी फर्स्ट प्रायोरिटी आहे. .
महिंद्रा थार रॉक्स SUV गाडीने एस यु व्ही सेगमेंट मध्ये स्वतःचा नावलौकिक कमावला आहे.या गाडीची ऑफ रोडिंग कॅपॅसिटी तर उत्तम आहेच ही कार यासोबत आपल्याला आरामदायी राईडचा देखील अनुभव देते. तुम्ही ऑफ रोडींग एसयूव्ही खरेदीचा विचार करत असाल तर थार रॉक्स तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरेल.
याबाबत घ्या पुढील update साठी whatsapp किंवा telegram join करा.
असाच नवीन अपडेटसाठी आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा
https://chat.whatsapp.com/BiVKJ4X9Mue6xZFwMJrBUX
असाच नवीन अपडेटसाठी आमच्या Telegram ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा.
https://t.me/Automotonews_marathi
Nissan Patrol 2024 मधील रहस्य काय? SUV प्रेमींसाठी नवा आश्चर्याचा धक्का !