Jeep Wrangler 2024 चे 7 नवीन फीचर्स जे बनवतात तिला एकदम खास

नुकतीच फेसलिफ्टेड जीप रँग्लर ही भारतीय बाजारपेठेत लाँच केली गेली आहे जी एक उत्तम ऑफ रोडर फोर व्हीलर आहे बोलायचे झाल्यास जीप रँग्लर ही एक प्रीमियम ऑफर व्हेईकल मध्ये मोजण्यात येते आणि तिचा एकमेव कॉम्पिटिटिव्ह हा लँड रोव्हर डिफेंडर आहे जो सर्वात प्रीमियम मध्ये गणला जातो त्यामुळे आपण अंदाज लावू शकतो की जीप रँग्लर किती क्लासिक आणि कुल असेल चला तर मग आपण या ब्लॉगमध्ये तिच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचल्याची खात्री करा.

Jeep wrangler 2024 ची काही वैशिष्ट्ये आपण पाहूयात :

० जीप रँग्लरमध्ये आपल्याला 1995 सीसी चे इंजिन मिळते
० याची पॉवर 268.2 bhp इतकी आहे
० टॉर्क :- 400 एनएम
० ट्रान्समिशन:- ऑटोमॅटिक
०ड्राइव्ह प्रकार :- 4WD
० फ्युल :- पेट्रोल

Jeep wrangler बाबतच्या काही लेटेस्ट खबरी जाणून घेऊयात

Jeep wrangler 2024 price in india :

किमतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्याला ही जीभ रँगलर जवळपास 68 ते 72 लाखांपर्यंत (एक्स-शोरूम पॅन इंडिया) विकत घेता येऊ शकते. हिच्या किमती या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या असल्याने अंदाजे आपण हिला खरेदी करण्यासाठी 70 लाखांपर्यंत बजेट ठेवणे आवश्यक आहे.

Jeep wrangler variants ची रूपे:

यामध्ये आपण बघूयात जीप रँग्लर चे किती व्हेरिएंट मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे आपल्याला असे समजते की Jeep wrangler 2024 ही दोन व्हेरियंटमध्ये आपल्याला अवेलेबल होत आहे ते म्हणजे अनलिमिटेड आणि रुबिकॉन.

Jeep wrangler Engine आणि transmission Specifications:

यावर्षी मार्केटमध्ये येणाऱ्या या 2024 च्या जीप रँग्लर मध्ये आपल्याला 2-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन (272 PS / 400 Nm) देण्यात आला आहे.
आणि याबद्दल अधिक सांगायचे झाले तर हे युनिट 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सोबत जोडण्यात आलेले आहे. त्याबरोबरच आपल्याला 4-व्हील-ड्राइव्ह (4WD) ड्राइव्हट्रेन हे अनलिमिटेड आणि रुबिकॉन या जीप रँग्लरच्या व्हेरियंटमध्ये ऑफर येत आहे.

Jeep wrangler top specification ची वैशिष्ट्ये: Jeep wrangler safety

जीपरँग्लर मध्ये देण्यात आलेल्या बेस्ट फीचर बद्दल आता आपण चर्चा करूया
१) आपल्या या .फेसलिफ्टेड रँगलरला वायरलेस अँड्रॉइड ऑटो तसेच Apple कारप्ले च्या जोडीने 12.3-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देखील देण्यात आली आहे,
२) एवढेच काय तर 7-इंच मल्टी-इन्फो डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले देखील आपल्याला यामध्ये देण्यात आला आहे याच्यासोबतच आपल्याला 9-स्पीकर अल्पाइन म्युझिक सिस्टम पण दिलेली आहे .
३) या सगळ्यांव्यतिरिक्त आपल्याला दिसते हीच फोर व्हीलर आपल्याला ड्युअल-झोन एसी देखील ऑफर करते. आणि याबरोबरच आपल्याला यामध्ये, 12-वे पॉवर-ॲडजस्टेबल फ्रंट सीट्स ॲडजस्टमेंट तसेच गरम झालेल्या फ्रंट सीट्स आणि हायटेड स्टीयरिंग व्हील देखील देण्यात आले आहेत.

Jeep wrangler safety ची सुरक्षा:

Jeep wrangler 2024 च्या सुरक्षिततेबाबत बोलायचं झाल्यास आपल्याला यामध्ये सेफ्टी साठी सहा एअर बॅग देण्यात आल्या आहेत, तसेच इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल म्हणजेच (ESC), आणि ट्रॅक्शन कंट्रोल त्याबरोबरच रीअरव्ह्यू कॅमेरा देखील देण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त आता ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम (ADAS) सारखी वैशिष्ट्ये देखील यात अवेलेबल करून देण्यात आली आहेत.

Jeep wrangler 2024 compitators प्रतिस्पर्धी:

Jeep wrangler 2024 ही लँड रोव्हर डिफेंडर तसेच मर्सिडीज-बेंझ जी-क्लास यांसारख्या मोठमोठ्या नामांकित फोर व्हीलर ला टक्कर द्यावी लागणार आहे.

Jeep wrangler बाबत तज्ञांचे मत काय आहे?
तज्ज्ञांच्या मतानुसार जीप रँग्लर 2024 ही एक प्रीमियम फोर व्हीलर आहे तसेच तिच्या जुन्या केबिन पेक्षा नवीन केबिन ही तिला मार्केटमध्ये एक वेगळे स्थान निर्माण करून देणार आहे तिची‌ ऑफ रोडर क्षमताही चांगली आहे.“

Jeep wrangler 2024 exterior चे बाह्यरूप :

रँग्लर च्या एक्सटेरियर बद्दल बोलायचं झाल्यास आपल्याला असे दिसून येईल की त्याच्या एक्सटेरियर मध्ये जुन्या वर्जन पेक्षा या वर्जन मध्ये तितकासा फरक करण्यात आलेला नाही बाहेरील डिझाईन दिसायला सेमच आहे परंतु त्यात असे बरेच काही बारीक बारीक डिटेल्स ॲड करण्यात आले आहेत ज्यामुळे ती एक ऍडव्हान्स फोर व्हीलर बनते आता पूर्ण ब्लॅक कलर मध्ये बनवण्यात आली आहे तसेच तिच्या इंजिनला आता हवेचे चांगल्या प्रवाहासाठी अनोख्या पद्धतीने डिझाईन केले आहे.

दुसरी गोष्ट सांगायची झाल्यास यामध्ये देण्यात आलेले अलॉय व्हीलचे डिझाइन हे ऑफ रोड टायर सोबत खरंच खूप छान दिसत आहे. तसेच, तिच्या टॉपला असलेला अँटेना आता विंडशील्डमध्ये ॲडऑन केला गेला आहे, हा अँटेना कॉर्निंग गोरिल्ला ग्लासपासून बनवला असल्याचे समजते. कारण यामुळे आता आपल्याला ऑफ-रोडिंग करताना ओरखडे आणि क्रॅक होण्याची काळजी आता मिटली आहे याबरोबरच आपला अँटिना पण सेफ राहणार आहे. अजून सांगायचं झालं तर तिच्या मागील भागही पूर्वीसारखा दिसतो त्यामध्ये आपल्याला फारसे बदल दिसत नाहीत‌.

Jeep wrangler 2024
Jeep wrangler interior आतील

आता आपण पाहूया जीप रँग्लर प आतून कशी दिसते तिच्यामध्ये काय बदल करण्यात आले आहे कशामुळे ती आता प्रीमियम मध्ये गणली जात आहे बाहेरच्या बाजूला अगदी कमी बदल करण्यात आले असले तरी देखील याच्या इंटरियर मध्ये खूप म्हणजे खूप बदल करण्यात आले आहेत जीपने डॅशबोर्डची रचना पूर्णपणे बदलली आहे त्यांनी केलेल्या डॅशबोर्ड च्या या पुनर्रचनेमध्ये लेदर फिनिश दिले आहे ज्यामुळे ते अगदी प्रीमियम‌ लुक देत आहे त्याबरोबरच एसी बटन आणि मध्यभागी कन्सोल ची रचना ही पूर्वीप्रमाणेच ठेवली आहे परंतु त्यांना वॉटरप्रूफ बनवण्यासाठी आता सील बंद करण्यात आले आहे.

तसेच यात देण्यात आलेले नवीन बिट्स हे केवळ दिसण्यासाठी नाही तरी वापरण्यासाठी ही तितकेच प्रीमियम आहेत यामध्ये वापरण्यात आलेल्या गोष्टींची क्वालिटी अतिशय प्रीमियम आणि कौतुकास्पद आहे हे नक्की कारण केबिनमध्ये प्रत्येक गोष्ट ही तिच्या किमतीच्या मानाने अतिशय योग्य असल्याचे जाणवते. आणि स्टीयरिंग व्हील, सेंटर कन्सोल तसंच क्लायमेट कंट्रोलवरील बटणे एकदम योग्य रीती ने सेटअप केली आहेत डॅशबोर्डवरील लेदर पॅडिंग पण एकदम क्लासी आहे. जेव्हा तुम्ही ऑफ रिडींग कराल तेव्हा तुम्हाला जाणवेल की केबिनच्या कोणत्याही भागात खडखड आवाज ऐकू येणार नाही. आउटगोइंग वर्जन मध्ये 2024 मध्ये द बेस्ट इंटिरियर देण्यात आले आहे

Jeep wrangler 2024 safety सुरक्षितता

Jeep wrangler 2024 जी सेफ्टी बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये देखील त्यांनी खूप सुधारण्या केल्याचे दिसून येते यामध्ये आपल्याला स्टॅंडर्ड म्हणून सहा एअरबॅक्स देण्यात आले आहेत याबरोबरच EBD आणि ABS म्हणजेच, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), तसेच ट्रॅक्शन कंट्रोल, ऑल-व्हील डिस्क ब्रेक्स आणि रीअरव्ह्यू कॅमेरा यांसारखे आवश्यक असणाऱे सर्व सेफ्टी फीचर्स यामध्ये अवेलेबल करून देण्यात आले आहेत फक्त इतकेच नाही तर याव्यतिरिक्त. यामध्ये ADAS (प्रगत ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम) देखील देण्यात आली आहे ज्यामध्ये अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, व हाय बीम असिस्ट आणि ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग यांचा देखील समावेश आहे

Jeep wrangler 2024 pros and cons

Jeep Wrangler बाबत आम्हाला आवडलेल्या गोष्टी👍🏻
० हिच्या लेटेस्ट लक्षवेधी डिझाईनमध्ये जुन्या वर्जन पेक्षा काही बारीक बारीक‌ सुधारणा करण्यात आले आहेत.
० यामध्ये देण्यात आलेले डॅशबोर्डवरील लेदर पॅडिंग आणि रुबिकॉन प्रकारातील नप्पा लेदर अपहोल्स्ट्रीसह तिच्या केबिन ला प्रीमियम लुक देते.
० ही आपल्याला प्रीमियम फीचर पॅकेजमध्ये 12.3-इंच टचस्क्रीन, तसेच 12-वे पॉवर आणि गरम ड्रायव्हर आणि पॅसेंजर सीट प्रोव्हाइड करते ज्या मध्ये ADAS चादेखील समावेश आहे .

Jeep Wrangler बाबत आम्हाला न आवडलेल्या गोष्टी
० ही 2-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिनसह येत असून देखील आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ऑफर केले‌ जाणारे V6 आणि V8 ऑप्शन आपल्याला अवेलेबल नाही.

Jeep wrangler 2024 mileage मायलेज :

जीप रँग्लरचे मायलेज हे 10.6 ते 11.4 kmpl आहे. आणि ऑटोमॅटिक पेट्रोल व्हेरियंटचे मायलेज 11.4 kmpl इतके आहे

Q) जीप रँग्लरची एक्झॅक्ट ऑन-रोड ‌ प्रायझिंग काय आहे?

अ) वेगवेगळ्या सिटीनुसार याच्या प्राईसिंग मध्ये बदल होतो परंतु दिल्लीतील रँग्लरची‌ किंमत सांगायची झाल्यास तिची ऑन-रोड किंमत ही जवळपास ₹ 80,94,692 पासून सुरू होते.

Q) Jeep wrangler 2024 साठी EMI किंवा डाउन पेमेंट किती करावे लागेल?

अ) जीप रँग्लर चा ईएमआय जवळपास ₹ 1.54 लाख प्रति महिना असेल जो 60 महिन्यांच्या कालावधीसाठी @ 9.8% ₹ 72.85 लाख कर्जाच्या रकमे पासून सुरु होईल आणि याचे डाउन पेमेंट ₹ 8.09 लाख इतके असेल.

Q) Jeep wrangler 4×4 आहे का?

अ) जीप रँग्लर ही भारतीय बाजारपेठेत 4 व्हील ड्राइव्ह ट्रान्समिशन आपल्याला देते.

Q) Jeep wrangler चे मायलेज किती आहे?

अ) जीप रँग्लरचे ARAI मायलेज हे जवळपास 10.6 – 11.4 kmpl च्या दरम्यान असल्याचे समजते.

Q) जीप रँग्लरसाठी आपल्याला कोणते कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत ?

अ) रँग्लरसाठी आपल्याला 5 कलर ऑप्शन्स मिळणार आहेत त्यामध्ये – ब्राइट व्हाइट ब्लॅक रूफ, फायर क्रॅकर रेड ब्लॅक रूफ,‌व ऍनव्हिल क्लियर कोट ब्लॅक रूफ आणि, सार्ज ग्रीन ब्लॅक रूफ आणि ब्लॅक यांचा समावेश आहे

Q) जीप रँग्लर ही 7 सीटर कार आहे का?

अ) नाही, जीप रँग्लर ही ७ सीटर नसून ती केवळ 5 सीटर कार आहे.

शहर आणि महामार्गा वरील पर्फोमन्स तसेच राइड आराम आणि ऑफ-रोड कॅपेसिटी चेक करण्यासाठी तपासण्यासाठी 2024 जीप रँग्लर बद्दल अधिक डिटेल चा आढावा देऊ लवकरच..

याबाबत घ्या पुढील update साठी whatsapp किंवा telegram join करा.

असाच नवीन अपडेटसाठी आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा

https://chat.whatsapp.com/BiVKJ4X9Mue6xZFwMJrBUX

असाच नवीन अपडेटसाठी आमच्या Telegram ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा.

https://t.me/Automotonews_marathi

तुम्हाला Nissan Patrol 2025 बद्दल अशीच माहीत जाणून घायची असेल इथे क्लिक करा….

Hyundai Alcazar: 7 अद्भुत वैशिष्ट्ये ज्यामुळे तुम्ही आश्चर्यचकित व्हाल !

1 thought on “Jeep Wrangler 2024 चे 7 नवीन फीचर्स जे बनवतात तिला एकदम खास”

Leave a Comment