Honda Elevate बद्दल तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर फक्त ब्रोशर वाचून ती खरेदी करायची आहे की नाही हे ठरवू नका एकदा का तुम्ही हा ब्लॉग वाचून होंडा सोबत तिचे एक्सक्लुसिव्ह फीचर जाणून घेतले की तुम्हाला लगेच खात्री होईल की हीच ती फॅमिली कार आहे जिच्या शोधा तुम्ही होता त्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा .
- स्टेप 2 ADAS ऑफरवर आपल्याला: अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ऑटो इमर्जन्सी ब्रेकिंग आणि लेन किप असिस्ट चे पर्याय देण्यात आले आहेत
2). त्याप्रमाणे यात दिलेला लेन वॉच कॅमेरा लेन बदलताना आपल्याला ब्लाइंड स्पॉट्स दूर करण्यात मदत करतो
3). इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये 7-इंच डिजिटल डिस्प्ले मिळणार आहे
Honda Elevate बद्दल मिळालेले काही लेटेस्ट अपडेट :
होंडाचं हे लेटेस्ट व्हर्जन नुकतेच भारतात लॉन्च करण्यात आले आहे भारतात लॉन्च करण्यात आलेल्या होंडाच्या या मॉडल मध्ये विशेषतः 15000 रुपयांच्या रिमीवर मिडस्पेक व्ही आणि व्ही एक्स टाईप वर आधारलेलं तरी त्याच्याशी निगडित बातम्यांमध्ये असे समजते की होंडाच्या ग्राहकांना ऑक्टोबर मध्ये जवळजवळ 75 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट देण्यात आले होते.
आता आपण जाणून घेऊया होंडाच्या प्राईसिंग बद्दल? काय असेल होंडाच्या लेटेस्ट व्हर्जन किंमत चला बघूया.
खरं पाहिलं तरHonda Elevate ची किंमत जवळपास 12 लाख ते 16 लाखांच्या दरम्यान असल्याचे समजते आणि त्यातल्या त्यात सांगायचं तर मॅन्युअल च्या किमतीत 11.70 लाख रुपयापासून सुरू होऊन 15.41 लाखांपर्यंत ही किंमत जाते आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स (CVT) सह व्हेरिएंट रु. 13.52 लाख ते रु. 16.43 लाख (सर्व किंमती एक्स-शोरूम, संपूर्ण भारतात आहेत).
होंडा एलिव्हेट मध्ये किती टाईप्स आहेत?
होंडा एलिव्हेट चार मेन टाइप आहेत ते पुढील प्रमाणे चला त्यांच्याबद्दल माहिती करून घेऊयात
हे प्रकार आहेत SV, V, VX आणि ZX. V आणि VX रूपे देखील 2024 च्या अखेरीस सणासुदीच्या दिवसांमध्ये लॉन्च होतील.
होंडा एलिवेट कारचा कोणता टाईप /प्रकार सर्वात (एक्स्पेन्सिव्ह) आहे
Honda Elevate चा मिड-स्पेक V व्हेरिएंट हा इतरांच्या तुलनेत जरा एक्स्पेन्सिव्ह आहे. या होंडाच्या प्रकारात आपल्याला एलईडी हेडलाइट्स आणि टेल लाइट्स मिळतात. एवढेच नाही तर यात वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, ऑटो एसी सोबतच 4-स्पीकर साउंड सिस्टमसह आणि 8-इंच टचस्क्रीन देखील मिळते. एकटीच्या दृष्टीने पाहिलं तर आपल्याला या कार मध्ये सहा एअर बॅग मिळतात याबरोबरच पार्किंग साठी बॅक कॅमेराही देण्यात आले आहे
तसेच तुम्हाला हवा असणार फीचर म्हणजे सनरूफ असलेला व्हेरियंट हवा असल्यास तुम्ही VX व्हेरियंटमध्ये अपग्रेड या ऑप्शनचा विचार करावा. कारण या प्रकारात आपल्याला मोठे ड्युअल-टोन अलॉय व्हील्स, सेमी-डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि वायरलेस फोन चार्जर देखील करून देण्यात आला आहे.
Contents :
Honda Elevate मध्ये असलेली वैशिष्ट्ये पाहुयात :
Honda Elevate चे टॉप-स्पेक व्हेरियंट मध्ये वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay सोबतच आपल्याला 10.25-इंच टचस्क्रीन आणि 7-इंच सेमी-डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले देखील देण्यात येतो. यामध्ये ऑटोमॅटिक एसी, वायरलेस फोन चार्जर, तसंच सिंगल-पेन सनरूफ आणि पुश-बटण स्टार्ट/स्टॉप देण्यात आलय.
मार्केटमध्ये कोणते इंजिन आणि ट्रान्समिशन ऑप्शन्स अवेलेबल आहेत
Honda ची जी कॉम्पॅक्ट SUV ती 1.5-लीटर पेट्रोल इंजिनसह रस्त्यावरती धावायला सज्ज आहे . ही कॉम्पॅक्ट SUV 121 PS आणि 145 Nm निर्माण करते. ही एकतर 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा 7-स्टेप सीव्हीटी (सतत व्हेरिएबल ट्रान्समिशन) ऑटोमॅटिक सोबत जोडली जाते.
Honda Elevate या कारचे मायलेज किती आहे?
आपण निवडलेल्या इंजिन आणि गिअरबॉक्स ऑप्शन नुसार Honda Elevate मध्ये मायलेज डिफरन्स आहे तो खालील प्रमाणे:
पेट्रोल MT: 15.31 kmpl
पेट्रोल CVT: 16.92 kmpl
होंडा एलिव्हेट सेफ्टी कार आहे का?
सेफ्टी फीचर्स बद्दल बोलताना या कार मध्ये सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये सहा एअरबॅग्ज देण्यात आले आहेत, तसेच इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल म्हणजेच (ESC), आणि हिल स्टार्ट असिस्ट, एवढेच नाही तर लेन वॉच कॅमेरा, व पार्किंग साठी बॅक कॅमेरा आणि ॲडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन-कीपिंग सारख्या ॲडव्हान्स ड्रायव्हर सहाय्य सिस्टीम (ADAS) ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, हे सगळे फीचर्स यात समाविष्ट करण्यात आले आहे त्यामुळे ही काय अतिशय सेफ कार मध्ये गणली जाईल .
होंडाच्या मॉडेलमध्ये आपल्याला किती कलर ऑप्शन्स मिळणार आहेत ?
यामध्ये आपल्याला खूप काही ऑप्शन्स अवेलेबल आहेत होंडा ही आपल्याला ड्युअलटोन ऑप्शनसोबत जवळजवळ दहा कलर्स ऑप्शन्स आपल्याला ऑफर करते. कलर्स ऑप्शन्स खालील प्रमाणे आहेत
१) फिनिक्स ऑरेंज पर्ल
२) ऑब्सिडियन ब्लू पर्ल
३) तेजस्वी लाल धातू
४) प्लॅटिनम पांढरा मोती
५) गोल्डन ब्राऊन मेटॅलिक
६) चंद्र चांदी धातू
७) मेटिओरॉइड ग्रे मेटॅलिक
८) क्रिस्टल ब्लॅक पर्ल छतासह फिनिक्स ऑरेंज पर्ल
९)क्रिस्टल ब्लॅक पर्ल छतासह प्लॅटिनम पांढरा मोती
१०) क्रिस्टल ब्लॅक पर्ल छतासह तेजस्वी लाल धातू
या कारमध्ये दिलेले मेन डिटेल्स जाणून घेऊयात
० या कारचे इंजिन :- 1498 सीसी आहे
० ह्या कार ची पॉवर ही :- 119 bhp देते
० या कारचा टॉर्क :- 145 एनएम आहे
० या कारची सीट कॅपॅसिटी:- ५ सीट्स इतकी आहे
० कारचा ड्राइव्ह प्रकार :- FWD असून
० कारचे मायलेज :- १५.३१ – १६.९२ किमी प्रति तास इतके आहे
Honda Elevate कारमध्ये देण्यात आलेले टॉप फीचर्स :
० कार मध्ये आवश्यक असलेले ऍडजेस्टेबल असे ड्रायव्हर सीट देण्यात आले आहे.
० एअर प्युरिफायर अवेलेबल आहे
० ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल देण्यात आला आहे
० सर्वांचं आवडतं फीचर सनरूफ देखील या कारमध्ये उपलब्ध आहे
० मागील बाजूस एसी व्हेंट्स देण्यात आले आहेत
० पार्किंग सेन्सर्स यात आहेत
० ADAS
० ॲडव्हान्स इंटरनेट फीचर्स
या कारमध्ये देण्यात आलेले दि बेस्ट फीचर्स
तुम्ही Honda Elevate खरेदी करावी का? ते पाहूया
Honda ने Elevate SUV ची किंमत ही तिच्या विरोधी कारला टक्कर देण्याइतकी जबरदस्त ठेवली आहे त्यामुळे
S U V स्पर्धात्मकपणे ठेवली आहे, ज्यामुळे ती त्याच्या विभागातील आकर्षक निवड बनते आणि स्वतःची क्रेझ निर्माण करते. विशेषत: म्हणजे Hyundai Creta आणि Kia Seltos सारख्या महागड्या प्रतिस्पर्ध्यां देखील जोरदार टक्कर देते.
त्याचप्रमाणे महत्त्वाची गोष्ट म्हणजे हाय रेंज प्राईस असूनही ती स्वतःतील प्रीमियम वैशिष्ट्यांमध्ये काही हयगय करत नाही त्यामुळे तिची प्राईज ही आपल्याला तिने दिलेले फीचर्सच्या मानाने अगदी योग्य वाटते. तसेच तिच्या इतर काही स्पर्धकांमध्ये नसलेले काही फीचर्स तिने देऊ केले आहेत त्यामध्ये पॅनोरॅमिक सनरूफ ड्युअल झोन एअर कंडिशनिंग आणि हवेशी सीट्स तिला इतरांपेक्षा वेगळे बनवते त्या किमतीच्या तुलनेत.
एवढं सगळं असूनही , आराम, पुरेशी स्पेस आणि सुरक्षितता यावर गोष्टींवर भर दिल्यामुळे एलिव्हेट एक स्टॅंडर्ड फॅमिली कार म्हणून वेगळी आहे. या पैलूंना प्राधान्य देणाऱ्या कारच्या शोधात असलेल्या खरेदीदारांसाठी, एलिव्हेट एक अतिशय महत्त्वाचा आणि मजबूत दावेदार ठरणार आहे.
होंडाला टक्कर देणारे प्रतिस्पर्धी कोण आहेत?
होंडा Elevate ला टक्कर देणाऱ्या स्पर्धकांमध्ये समावेश आहे यांचा ज्यामध्ये Hyundai Creta, Kia Seltos, असंच Maruti Grand Vitara, Toyota Hyryder आणि, Volkswagen Taigun, Citroen C3 Aircross व, Skoda Kushaq आणि MG Astor हे आहेत तर Tata Curvv आणि Citroen Basalt या दोन्ही एलिव्हेटसाठी स्टायलिश एसयूव्ही-कूप पर्यायी ऑप्शन्स आहेत.
Honda Elevate बाबत तज्ञांचे मत काय आहे जाणून घेऊया:-
Honda Elevate त्याच्या किंमतीचे समर्थन करण्यासारखे आहे . फॅमिली कारच्या लेन्समधून आपण जर पाहिले आपल्याला समजेल — आरामदायी, पुरेशी स्पेस, गुणवत्ता आणि सुरक्षिततेला प्राधान्य देणाऱ्या गोष्टी हिने अधोरेखित करत स्वतःमध्ये उपलब्ध करून दिल्या असल्याने — एलिव्हेटला दोष देणे खरोखर कठीण आहे.” ती एक बेस्ट फॅमिली कार म्हटली जाऊ शकते
कार बाबत आम्हाला आवडलेल्या गोष्टी
० अतिशय सिम्पल आणि ऍडव्हान्स डिझाईन
० दर्जेदार इंटीरियर कॉलिटी अवेलेबल करून दिले आहे
० मागच्या सीटवर बसणाऱ्यांसाठी भरपूर लेगरूम आणि हेडरूम देण्यात आली आहे
० बूट स्पेसमध्ये सर्वोत्तम ठरली आहे ही कार.
कार मध्ये या गोष्टी ही असणे अपेक्षित होते
० डिझेल किंवा हायब्रिड असे ऑप्शन्स मिळायला हवे होते
० प्रतिस्पर्ध्यां विरूद्ध टक्कर देताना काही वैशिष्ट्यांचा अभाव जाणवतो जस की:
, फ्रंट सीट वेंटिलेशन, 360° कॅमेरा
भारतात मध्ये होंडाच्या किंमती:
शहर. ऑन-रोड किंमत
० बंगलोर. मध्ये रु. 14.57 – 20.34 लाख दरम्यान आहे
० मुंबई. मध्ये रु.13.94 – 19.68 लाख दरम्यान आहे
० पुणे. मध्ये रु. 13.77 – 19.24 लाख दरम्यान असेल
० हैदराबाद. मध्ये रु. 14.35 – 20.31 लाख या रेंजमध्ये असेल
० चेन्नई. मध्ये या कारची किंमत रु. 14.47 – 20.48 लाख असेल.
० अहमदाबाद मध्ये रु. 13.22 – 19.29 लाख दरम्यान असेल
० लखनौ. मध्ये रु. 13.60 – 18.98 लाख एवढी असेल
० जयपूर. मध्ये रु.13.69 – 19.37 लाख आहे
FAQs
Q) Honda Elevate ची नेमकी ऑन-रोड किंमत किती असेल ?
A) दिल्लीतील एलिव्हेटची ऑन-रोड किंमत ₹ 13,51,386 पासून सुरू होते. आणि यामध्ये ऑन-रोड किंमत यात RTO शुल्क आणि तसेच विमा समाविष्ट केलेआहे.
Q) कोणती कार चांगली आहे एलिव्हेट किंवा एक्स्टर ?
A) एलिव्हेट ची किंमत ₹ 11.69 लाख एक्स-शोरूमपासून सुरू होते आणि एक्स्टर ची किंमत 6.13 लाख एक्स-शोरूमपासून सुरू होते.
Q) होंडा एलिव्हेट 4×4 मध्ये अवेलेबल आहे का?
A) होंडा एलिव्हेट हे भारतीय बाजारपेठेत आपल्याला 4 व्हील ड्राइव्ह ट्रान्समिशन अवेलेबल नाही
Q) होंडा एलिव्हेट ही 5 किंवा 7 सीटर SUV ऑप्शन मध्ये आहे का?
A) होंडा एलिव्हेट ही 5 सीटर कार आहे, जी ची किंमत जवळपास ₹ 12.86 लाख पासून सुरू होते.
Q) होंडा एलिव्हेट कार चे मायलेज किती आहे?
A) होंडा एलिव्हेट चे ARAI मायलेज हे 15.31 – 16.92 kmpl च्या दरम्यान आहे असल्याचे समजते.
Renault Duster च्या Official वेबसाईट वर माहिती पहायची असेल इथे Click करा ……..
तुम्हाला Maruti Jimny 4X4 बद्दल अशीच माहीत जाणून घायची असेल इथे क्लिक करा….
याबाबत घ्या पुढील update साठी whatsapp किंवा telegram join करा.
असाच नवीन अपडेटसाठी आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा
https://chat.whatsapp.com/BiVKJ4X9Mue6xZFwMJrBUX
असाच नवीन अपडेटसाठी आमच्या Telegram ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा.
https://t.me/Automotonews_marathi