Tata Harrier EV: ब्लॅकआऊट स्टील्थ एडिशनमुळे लोकांमध्ये निर्माण झालेला क्रेझ आणि आकर्षण
Tata Harrier EV बाबतीत लोकांमध्ये क्रेझ होती .एक वाईब निर्माण झालेली. लोकांना ब्रोशर वाचण्याची आवश्यकता भासत नव्हती इतकी instagram वरती त्या गाडीच्या रिल्सने लोकांचे लक्ष वेधून घेतले. गाडी खरेदी करताना कधी पण गाडी स्पेक्स साठी नाही तर सेल्फ बिलीव्ह साठी खरेदी केली जाते. अशा या ब्लॅकआऊट स्टील्थ एडिशन असलेल्या स्वतःच्या वेगळेपणांनी लोकांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेणार्या या गाडीने अनेक लोकांना पाहता क्षणी प्रेमात पाडल.
अशा या Tata Harrier EV ने मार्केटमध्ये फक्त एन्ट्री केली नाही तर तिने लोकांच्या मनात स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. ती इतर गाड्यांपेक्षा वेगळी ठरते, असं का?आणि ईव्ही आहे फक्त, त्यात काय एवढं ?असं म्हणणाऱ्या लोकांनी जेव्हा Tata Harrier EV ला पाहिलं तेव्हा त्यांची तोंड गप्प झाली ती कारण या गाडीचा परफॉर्मन्स आणि तिचा प्रेजेंस लोकांना एवढा थक्क करणारा होता की तिने प्रीमियम गाड्यांच्या दुनियेला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं.




