MG Windsor EV जी अनेक फायद्यांसह येते ज्यात तिची विशिष्ट रचना, एक प्रशस्त केबिन आणि पुरेशी स्पेस देखील अव्हेलेबल आहे. ह्युंदाई क्रेटा सारखा आकार असून देखील, ते टाटा हॅरियरपेक्षा जास्त स्पेस उपलब्ध करून देते. याव्यतिरिक्त, ही कार खरेदी करताना, आपल्याला बॅटरीसाठी ॲडव्हान्स पेमेंट देण्याची देखील आवश्यकता नाही. ते आपण सविस्तर या ब्लॉगमध्ये समजून घेऊयात.यापूर्वी ही कार फॅमिली कार म्हणून खरच योग्य आहे का ? ते बघुया . यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा.
Contents
बाह्यरूप
विंडसरची कल्पना सुरुवातीपासूनच इलेक्ट्रिक वाहन म्हणून करण्यात आली होती, त्यामुळे त्याला इंजिनसाठी जागा लागायचा प्रश्न निर्माण होत नाही. त्याच्या कॉम्पॅक्ट आकारामुळे खुप “क्यूट “दिसते . प्रीमियम वैशिष्ट्यांचीही यात कोणत्याच प्रकारची कमतरता भासत नाही. फ्रंटला कनेक्टेड LED DRLs आणि LED हेडलाइट्स आहेत. आणि अर्थातच, प्रकाशित एमजी लोगो रात्री हायलाइट होतो. समोर, क्रोम ॲक्सेंटसह एक ग्लॉस ब्लॅक पॅनेल देखील आहे, जे कारला अधिक अपस्केल लुक देतात.




