MG Comet EV चीच निवड का करावी?
शहरात राहणाऱ्या लोकांमध्ये आता कॉम्पॅक्ट आणि इको फ्रेंडली कार खरेदी करण्याचे प्रमाण वाढत आहे. मोठ्या कार जरी आपल्याला अधिक बूट स्पेस ऑफर करत असल्या तरी देखील त्या पुणे मुंबई सारख्या शहरांच्या ट्रॅफिक मध्ये खूपच त्रासदायक याच समस्येच्या उपाय म्हणून एक स्मार्ट पर्याय आता मार्केटमध्ये आलेला आहे. तो म्हणजे MG Comet EV
MG Comet EV या कार बद्दल बोलायचं झालं तर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि खिशाला परवडणारी असून पण स्टायलिश डिझाईन असलेली कार आहे जर तुम्ही शोधत असाल तर ही कार तुमच्यासाठी अतिशय योग्य आहे.
MG Comet ची रचना आणि डिझाईन
कॉम्पॅक्ट डिझाईन:
MG Comet EV . या कारची लांबी फक्त २,९७४ मिमी असल्याने ही कार इंडियन मार्केट मधील सर्वात लहान गाड्यांपैकी एक आहे.
ड्युअल-टोन रंग:
या कार ला अधिक स्टायलिश करण्यासाठी यामध्ये निरनिराळ्या ड्युअल-टोन कलरचे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत ज्याने ही कार अतिशय आकर्षक दिसते.




