Lamborghini पहिली Electric Car, टेमेरारियो निर्भय डिझाइन आणि हायब्रिड पॉवरट्रेनसह
Lamborghini ची पहिली इलेक्ट्रिक कार आणि लौंचमधील रहस्यमय खुलासे माहिती करून घेण्यासाठी हे वाचा… ! V10 इंजिनची गुपितं उघडण्याची वेळ आली आहे.
हुराकनचा बहुप्रतिक्षित असलेला उत्तराधिकारी तसेच लॅम्बोर्गिनी च्या पहिल्या Electric Car रहस्य अखेर उघड ! कुटुंबातील सर्वात लहान member लॅम्बोर्गिनी टेमेरारियो अखेरीस launch झाला आहे. स्पॅनिश लढाऊ बैलांच्या नावावर ठेवण्यात येत असलेल्या या मॉडेलची परंपरा मोडून (हुराकन त्यामधीलच एक मॉडेल आहे), टेमेरारियोचे नाव ठेवण्यात आले आहे. टेमेरारियोचे भाषांतर “निर्भय” किंवा “बेपर्वा” असे होते . या एका महत्त्वाच्या फरकामुळे हे स्वतःला पूर्वीच्या एंट्री-लेव्हल लॅम्बोसपासून वेगळे करते:
ब्रँडच्या ट्रेडमार्कमधील एक बनलेले V10 इंजिन गायब केले आहे, ज्यामुळे भविष्यात Lamborghini ला चालना देणाऱ्या नवीन V8-आधारित हायब्रिड पॉवरट्रेनचा मार्ग आत्ता मोकळा झाला आहे. या नवीन करण्यात आलेल्या जोडणीमुळे टेमेरारियोला मोठ्या प्रमाणात पॉवर आउटपुट मिळतो, त्याप्रमाणेच पुढे जाणाऱ्या विद्युतीकरणासाठी ब्रँडच्या वचनबद्धतेची देखील पुर्तता होते.याच कारणामुळे इटालियन सुपरकार निर्माता लॅम्बोर्गिनी ने लोकप्रिय हुराकन मॉडेलचा उत्तराधिकारी म्हणून टेमेरारियोचा खुलासा केला. लॅम्बोर्गिनी च्या PHEV लाइनअपमधील टेमेरारियो हे तिसरे वाहन आहे. हे 4.0-लिटर ट्विन-टर्बो V8 सोबत सुसज्ज आहे जे 789 BHP आणि 730 Nm टॉर्क ची निर्मिती करते, 3.8 kWh इलेक्ट्रिक मोटरसह 150 HP आणि 300 Nm टॉर्क ची निर्मिती करते. क्रेझी 907 BHP चे एकत्रित आऊटपुट देऊन, 10,000 RPM पर्यंत रिव्हिंग ! हे त्याच्या पूर्ववर्ती पेक्षा 2000 RPM जास्ती आहे!हे साध्य करण्यासाठी तीन अक्षीय-फ्लक्स मोटर्स ची मदत होते . लॅम्बोर्गिनी टेमेरारियो ही 0-100 किमी/ताशी वेगाने 2.7 सेकंदात जाऊ शकते आणि Lamborghini चा Speed 340 किमी/तास आहे. पॉवर आउटपुट 8-स्पीड ड्युअल-क्लच ट्रान्समिशनमार्फत इंजिनच्या मागे आडवा बसवले जाते. V10 वरून आकार कमी करणे ही ठिकच वाटत आहे.
Lamborghini Features :
PHEV असल्याने, तुम्हाला बाहेर जाण्याची गरज लागणार नाहीये तुम्ही ते घरीच चार्ज करू शकता आणि पूर्ण चार्ज होण्यासाठी फक्त 30 मिनिटांचा अवधी लागेल.परंतु त्याच्या समर्पित “हायब्रीड” मोडमध्ये, वाहन केवळ इलेक्ट्रिक पॉवरवर धावू शकते, 187 HP देते. “रिचार्ज” मोड V8 इंजिनला त्याच्या all over अश्वशक्तीच्या 715 HP वापर करुन , सर्वात जलद गतीने बॅटरी रिचार्ज करण्यास सक्षम करते. तिसरा मोड हा, “परफॉर्मन्स”, इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटर्स या दोन्हींच्या पूर्ण आउटपुटचा उपयोग करून शक्ती वाढवण्यासाठी मदत करतो.




