Bajaj Chetak EV – परंपरा आणि तंत्रज्ञानाचं परिपूर्ण मिश्रण
हे नाव तुमच्यासाठी नक्कीच अनोळखी नसेल. कारण 90 मध्ये Bajaj chetak हे स्टेटस सिम्बॉल म्हणून लोक याच्याकडे बघायचे. अनेकांच्या आठवणींमध्ये याचा मेनरोल राहिला आहे. आता हा Chetak आपल्याला इलेक्ट्रिक मध्ये अवेलेबल झालाय. ही स्कूटर किंवा स्कूटर नसून एक प्रकारची लेगसी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आपला तो जुना हिरो आता मार्केटमध्ये नेक्स्ट न्यू जनरेशन विथ न्यू टेक फीचर्स अँड ॲट्रॅक्टिव्ह लुक मध्ये आला आहे.
जर तुमच्याकडे अजूनही जुनी पेट्रोल स्कूटर आहे ते आता बाजूला सारायची वेळ आली आहे कारण मार्केटमध्ये आता ईव्ही स्कूटर लॉन्च झाले आहे. Bajaj chetak EV स्कूटर जे रेट्रो लुक मध्ये आपल्याला मॉडर्न टच असलेल्या परफेक्ट कॉम्बो या स्कूटरमध्ये असल्याचं पाहायला मिळतं या स्कूटर ची फुल बॉडी मेटलनी बनलेली आहे प्लास्टिकचा उपयोगामध्ये केलेला दिसत नाही. मेड इन इंडिया असलेली ही इलेक्ट्रिक स्कूटर वापरताना आपल्याला खरंच प्राइड फुल मोमेंट देते.
आता तीच आपल्याला इलेक्ट्रिक वर्जन मध्ये उपलब्ध झाली आहे. लोकांचे तिच्यासोबत चे आठवणींचे बंध अजून कायम आहेत . तिच्या बाबतीत ट्रस्ट फॅक्टर लोकांमध्ये अजून देखील तितकाच कायम आणि अढळ आहे. मार्केटमध्ये इतर कितीही तिचे स्पर्धक तिच्याशी स्पर्धा करायला पाहत असले तरी या स्कूटरचा फॅन बेस काही कमी नाहीये.




