Mahindra Thar Roxx : SUV सेगमेंटमध्ये नवा क्रांतिकारक बदल
आज आपण या ब्लॉग मध्ये एक अशा गाडी विषयी माहिती जाणून घेणार आहोत जिने काही कालावधीतच मार्केटमध्ये स्वतःची भयंकर क्रेझ निर्माण केली. जी ऑफ रोड साठी तर सुपर बेस्ट ऑप्शन आहे. ती फोर व्हीलर आहे,
महिंद्रा थार रॉक्स ही गाडी म्हणजे एसयूव्ही सेगमेंट मधील कोहिनूर हिराच म्हणायला हरकत नाही. असे म्हणण्या मागचे कारण म्हणजे या गाडीचे दमदार इंजिन यासोबतच कितीही मोठा अडथळ्यांवर मात करण्याची या गाडीमध्ये असलेली कॅपॅसिटी एवढेच नाही तर दिसायलाही कार अतिशय आकर्षक डिझाईन मध्ये आहे.
आणि ही गाडी आपल्याला ऑफ रोड राईड चा जबरदस्त अनुभव देण्यासाठी सज्ज आहे. ही गाडी ग्राहकांच्या पसंतीस पडत आहे. ग्राहकांमध्ये या गाडी विषयी एक वेगळीच क्रेज निर्माण झाली आहे या कारणामुळे 2024 मध्ये महिंद्राने तिचे लेटेस्ट मार्केटमध्ये लॉन्च केले ज्याचं नाव आहे ” थार रॉक्स” ही एसयूव्ही सेगमेंट मध्ये लॉन्च करून मार्केटमध्ये ग्राहकांना अनोखा सरप्राईज दिले आहे.
Mahindra Thar चा इतिहास
या गाडीची सुरुवात झाली 1949 पासून ज्या काळी महिंद्राने अमेरिकन जिप चा लायसन टेक्नॉलॉजी भारतात आणली.खरंतर ही गाडी आर्मी वाल्यांसाठी बनवण्यात आली होती. असं असलं तरी देखील नंतर तिचा उपयोग शेतकरी तसेच व्यापारी आणि ऑफराइड राईड साठी उत्सुक असलेले लोक देखील करू लागले. हे लक्षात घेऊन महिंद्रा ने 2010 मध्ये पहिली थार लॉन्च केली. यामध्ये महिंद्रा ने ऍडव्हान्स फीचर्स ऍड केले. आणि यात कारचा लूकही अतिशय क्लासी दिसत होता. या कारणांमुळेच थारची प्रचंड क्रेज मार्केटमध्ये निर्माण झाली. एसयूव्ही सेगमेंट मध्ये तिने एक वेगळेच स्थान निर्माण केले.




