Hyundai Creta EV – 10 गोष्टी जे खरेदीपूर्वी तुम्हाला माहीत असायलाच हव्यात !

Hyundai Creta EV – एक स्मार्ट इलेक्ट्रिक SUV! फीचर्स, चार्जिंग, रेंज, खर्च आणि अजून बरेच काही

इलेक्ट्रिक कार बद्दल जे तुम्हाला असे काही प्रश्न पडत असतील
या कार्स‌ चार्जिंग कसं करायचं ??
यांसाठी रिसेल मिळत का??
ईव्ही चालवायला अवघड आहे का??

चला तर मग या ब्लॉगमध्ये आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळवूया.

इलेक्ट्रिक कार बद्दल सामान्य शंका आणि उत्तरं

Hyundai Creta EV ची बॅटरी, रेंज आणि चार्जिंग डिटेल्स

हुंडाई Hyundai Creta EV मध्ये बॅटरीचे दोन व्हेरियंट अवेलेबल आहे
ज्यामध्ये पहिला आहे तो आपल्याला ४२ kWh स्टॅंडर्ड रेंज देतो
दुसरा ५१.४kwh लॉंग रेंज देतो. लोकांना मात्र पहिल्या बॅटरी वेरीएंट पेक्षा हा दुसराच अधिक बेटर वाटतो.

रियल रेंज किती आहे??

४२ kWh या बॅटरी ऑप्शन्सची ARAI रेंज साधारणपणे 390 किलोमीटर सांगितली जरी गेली असली तरी रियल रेंज मध्ये 330 ते 350 किलोमीटर एवढी रेंज देते.
५१.४kWh या बॅटरी ऑप्शन ची ARAI रेंज 473 किलोमीटर आहे आणि रियल रेंज 410 ते 430 किलोमीटर देते

एकंदरीत सांगायचं झालं तर काय एकदा का गाडीला पूर्ण चार्जिंग केली तर मुंबई पुणे मुंबई प्रवास अगदी सहज करता येतो.

Hyundai Creta EV चार्जिंग साठी किती वेळ घेते?
Ac होम चार्जर जो 7.2kw चा असतो त्याने ही इलेक्ट्रिक कार चार्ज करण्यासाठी साडेसहा तास लागतात.
पण जर DC फास्ट चार्जर ने चार्जिंग केली तर 50 टक्के चार्जिंग पूर्ण व्हायला केवळ 25 ते 30 मिनिटे लागतात.

Hyundai Creta EVचे इंटेरियर फीचर्स आणि स्पेअर पार्ट्स – काय खास आहे?

० कार ही अतिशय प्रीमियम बनवण्यात आली आहे या कारमध्ये आपल्याला मेन अट्रॅक्शन आहे ते म्हणजे ड्युअल स्क्रीन देण्यात आली आहे एक म्हणजे इन्फोटेनमेंट साठी तर दुसरा आपल्याला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर साठी.
० वायरलेस अँड्रॉइड ऑटो तसंच एप्पल कार्प्ले चा ऑप्शन तर यामध्ये दिलेलेच आहे.
० यासोबतच इलेक्ट्रॉनिक गिअर सिलेक्टर
० व्हॉइस कंट्रोल एसी तसेच सनरूफ सारखे अनेक आपल्याला ऍडव्हान्स फीचर या गाडीमध्ये पाहायला मिळतात.

० यामध्ये आपल्याला स्टेरिंग टील्ड आणि टेलिस्कोपिक असे दोन्ही पर्याय मिळतात ज्यामध्ये कुठल्याही हाईट साठी आपण ते गरजेनुसार बदलू शकतो.
० एवढेच काय तर फ्रंट व्हेंटिलेटर सीट्स आहे ड्रायव्हर ड्रायव्हरला हवं तसं टेंपरेचर आणि पॅसेंजर त्याला हवं ते टेंपरेचर ऍडजेस्ट करू शकतो असा ऑप्शन आपल्याला देण्यात आलेला आहे
० यासोबतच आपल्याला रियर एसी व्हेन्स सोबतच चार्जिंग पॉइंट देखील यामध्ये मिळतात. कारचे spare पार्ट इजिली अवेलेबल आहेत का?

या कारचे
० फ्रंट आणि रेअर बंपर्स
०चार्जिंग सॉकेट प्लस केबल
० टच स्क्रीन युनिट
० टेल लॅब हेड लॅम्प सस्पेन्शन
०केबिन फिल्टर , ब्रेक पॅड सेक्स , वायपर ब्लेड्स
यांसारखे स्पेअर पार्ट मार्केटमध्ये सहज रित्या उपलब्ध आहेत आणि ही गाडी इलेक्ट्रिक असल्यामुळे इंजिन पार्टची गरजच लागत नाही त्यामुळे कसली देखभालीची चिंता नाही तसेच इंजिनच्या एखाद्या पार्ट न मिळण्याची चिंता ही नाही.

Hyundai Creta EV टायर्स सस्पेन्शन आणि सेफ्टी

० या कारच्या सस्पेन्शन बद्दल सांगायचं झाल्यास फ्रंटला आपल्याला मॅक फेरसन स्ट्रेट विथ कॉइल स्प्रिंग मिळते.
रिअर मध्ये आपल्याला कपल्ड torsion भीम एक्सेल देण्यात आला आहे यासोबत सॉफ्ट ट्युंड‌ मुळे रस्त्यावर चालवताना गाडी गडगडत नाही.

० सेफ्टी साठी आपल्याला या क्रेटा इलेक्ट्रिक मध्ये सहा एअरबॅग मिळतात यासोबत एबीएस प्लस ईबीडी या व्यतिरिक्त 360 डिग्री कॅमेरा आणि हिल होल्ड ट्रॅक्शन कंट्रोल ईएसपी यांसारखे अधिकाधिक सेफ्टी फीचर दिले गेले आहेत.

Hyundai Creta EV ही पेट्रोल वर्सेस डिझेल पेक्षा बेस्ट का?

Hyundai Creta EV व इतर गाड्यांशी तुलना – खरंच बेस्ट आहे का?

क्रेटाच्या पेट्रोल आणि डिझेल व्हेरिएंट साठी आपल्याला पेट्रोल डिझेल साठी वार्षिक खर्च साधारणपणे 80 हजार ते 90 हजारांपेक्षा जास्त होतो त्यातून नेट क्रेटा इव्ही चा वार्षिक खर्च हा केवळ 12000 ते 15000 इतका होतो या कारला मेंटेनन्स सही पेट्रोल डिझेल पेक्षा कमी लागतो तसेच या क्रेटाच्या ईव्हीसाठी आपल्याला सबसिडी देखील अवेलेबल आहे.

क्रेटा इझी मोठी आहे पण तितकी मोठी तिची बूट स्पेस आहे का??

हो आपल्याला पुष्कळ बूट स्पेस दिली गेली आहे.
या कारमध्ये आपल्याला एक्स्ट्रा फ्रंक म्हणजेच फ्रंट बूट देखील मिळतो जिथे आपल्याला चार्जिंग वायर टूलकिट ठेवता येतात. तसंच मोठं सामान ठेवायचा असल्यास आपल्याला या कारमध्ये फोल्डेबल रिअर सीट्स चा पर्याय आहे.

Hyundai Creta EV लॉन्च डेट ??

हुंडाई Hyundai Creta EV ही काय जानेवारी 2025 ला लॉन्च करण्यात आली फेब्रुवारी महिन्यात 738 युनिट विकल्या गेल्या हुंडाईचा हे मोठं यश पाहिजे . मार्च आणि मे महिन्यात या क्रेटा‌ इवी चे लॉगिन मिळून 3345 युनिट विकल्या गेले आहेत.
यामुळे आपल्याला मार्केटमध्ये या कारची किती क्रेझ आहे याची हलकीशी जाणीव होते.

पण आता या कारचा क्रेझ घटतोय की वाढतोय??

०सुरुवातीच्या हाइप नंतर‌ Hyundai Creta EVची क्रेझथोडीशी कमी झाल्याचे आपल्याला दिसतं याचं कारण म्हणजे मार्केटमध्ये येणारे टॉप कंपनीचे कॉम्पिटिशन टाटा ,महिंद्रा यांसारख्या स्ट्रॉंग कॉम्प्युटर मुळे थोडासा क्रेटा इव्हीच्या सेल्स वर परिणाम झाल्याचा पाहायला मिळतो.

० अजून पण जागोजागी पाहिजे तितके चार्जिंग पॉइंट पाहायला मिळत नसल्यामुळे बरेच लोक इलेक्ट्रिक कार साठी नाक मुरडतात त्यांना ते तितके सोयीस्कर वाटत नाही.

पेट्रोल डिझेल क्रेटा एवढी जास्त प्रसिद्ध का आहे??
खरं सांगायचं झालं तर ICE क्रेटा ही भारतीय एसयूव्ही मार्केटमध्ये पायरवलेली ब्रँड आहे. त्या तुलनेने EV क्रेटा अजूनही मार्केटमध्ये न्यू कीड आहे पण प्रीमियम सेगमेंट मध्ये ती सर्वोत्तम ठरते तिची सध्या विक्री ICE क्रेटा पेक्षा जरी कमी असली तरी फ्युचर मध्ये ती खतरनाक सेल करणार अशी शक्यता नाकारता येत नाही.

Hyundai Creta EVचा मेंटेनन्स खर्च किती येतो??
या टीव्ही मध्ये गिअरबॉक्स क्लच असं काही लागत नसल्यामुळे तिचा मेंटेनन्स अगदी कमी आहे तरी सांगायचं झालं तर या कार्यासाठी आपल्याला वर्षाला मेंटेनन्स चा खर्च तीन ते पाच हजार या दरम्यान येऊ शकतो.

या कारची बॅटरी बदलायला किती खर्च येईल??

हुंडाई आठ वर्षांची बॅटरीची वॉरंटी देते. तसं पाहायला गेलं तर बॅटरी साठी लागणारा खर्च सहा ते आठ लाख इतका येऊ शकतो पण आपल्याला मिळत असणाऱ्या आठ वर्षांची गॅरंटी मुळे आपल्याला ती गरज साधारणता भासत नाही.

Hyundai Creta EV महिलांना चालवण्यासाठी योग्य आहे का?
या गाडीमध्ये गिअर नाहीयेत क्लच नाहीये, सॉफ्ट स्टेरिंग आहे पार्किंग सेन्सर पण दिलेले आहेत त्यामुळे सिटीमध्ये आपण चालू शकतो त्यामुळे ही कार लेडीज साठी ही बेस्ट ऑप्शन आहे चालवायला अगदी सोपी पार्किंग विथ सेफ्टी फीचर्स.

हुंडाई Hyundai Creta EV खरेदी करावी का??

० हो नक्कीच जर तुम्ही डेली शंभर ते दीडशे किलोमीटर ट्रॅव्हल करत असाल तर ही तुमच्यासाठी एक बेस्ट चॉईस ठरू शकते सिटीमध्ये चार्जर पॉईंट उपलब्ध असल्यामुळे तुम्हाला चार्जिंग साठी कोणताही प्रॉब्लेम येणार नाही तसेच प्रीमियम आणि फ्युचर रेडी

० पण जर तुम्हाला हायवेवर ड्राइव करायचे असेल आणि फास्ट चार्जर तुम्हाला इजिली अवेलेबल नसेल तर मात्र तुम्ही ही खरेदी करताना थोडा विचार करा. आणि ही विकत घेताना तुमचं इझी मेंटेनन्स नॉलेज पुरेसं असेल तरच ती खरेदी करा.

एकंदरीतच काय तर हुंडई Hyundai Creta EV ही केवळ इलेक्ट्रिक कार नसून भारतामधल्या एका स्मार्ट नागरिकांसाठी तिच्या न्यू जनरेशन मध्ये त्याचा अडपटिव्ह स्टेटस जपणारी, कमी मेंटेनन्स असलेली आणि स्मार्ट लिविंग तसेच सस्टॅनेबिलिटी देणारी कार आहे असं म्हणायला हरकत नाही.

याबाबत घ्या पुढील update साठी whatsapp किंवा telegram join करा.

असाच नवीन अपडेटसाठी आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा

https://chat.whatsapp.com/BiVKJ4X9Mue6xZFwMJrBUX

असाच नवीन अपडेटसाठी आमच्या Telegram ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा.

https://t.me/Automotonews_marathi

https://automotonews.in/daily-update