Hyundai Venue: 10 अत्याधुनिक फीचर्स जे तुमच्या ड्राईव्हला बनवतील आरामदायी आणि खास
Hyundai Venue ही कार 2019 मध्ये ग्राहकांच्या भेटीसाठी अवतरली. इतकेच काय तर ही कार हुंडाईची पहिली पहिली सब कॉम्पॅक्ट SUV आहे. शहरातील लोकांसाठी तर ही कार म्हणजे उत्तम पर्याय आहे. आणि लहान कुटुंबासाठी पण हा बेस्ट ऑप्शन आहे या कारची ॲडव्हान्स डिझाईन्स आणि अपडेटेड फीचर्स तसेच इंजिन परफॉर्मन्स आपले लक्ष तिच्याकडे वेधून घेतो. या सगळ्या कारणांमुळे तीने अल्पावधीतच एसयूव्ही प्रेमींमध्ये त स्वतःची क्रेझ निर्माण केली.
Hyundai Venue बद्दलच्या इंटरेस्टिंग फॅक्टस् :-
हुंडाई Venue या कारचे नाव ,ज्याचा अर्थ असा होतो की जिथे लोकांना जायला आवडते ती जागा.या आयडिया मधून या कारचे बारसे घालण्यात आले आहे,असं म्हणायला हरकत नाही. या कंपनीने ही कार बनवताना काही बाबींनी लक्षात घेऊन या कारची निर्मिती केली आहे ज्यामध्ये आपली नवी जीवनशैली आणि सिटीमध्ये ड्रायव्हिंगची गरज ह्या दोन समस्या लक्षात घेऊन त्यावर उपाय काढून कारची निर्मिती केल्याचा आपल्याला समजेल.
2019 मध्ये न्यूयॉर्क या शहरात झालेल्या मोटर शो मध्ये वेन्यू ही जग पातळीवर लॉन्च करण्यात आली. कारणामुळे हुंडाईला वेन्यू ने एका नवीन उंचीवर नेऊन ठेवले. एवढेच काय तर ही गाडी जेव्हा भारतात लॉन्च झाली तेव्हाही या कार ने तिची क्रेज कायम ठेवली. आणि एक नवीन यशाचा टप्पा गाठला. Venue चे नाव तर एवढे जास्त पॉप्युलर झालं की विचारू नका.
Hyundai Venue ची खास वैशिष्ट्ये :
० इंजिन पर्याय.
1) 1.2-लिटर पेट्रोल:
डेली यूज साठी आपल्याला इतकं मायलेज पुरेसा आहे.
2) 1.0-लिटर टर्बो पेट्रोल:
ज्या लोकांना फास्ट आणि पावरफुल ड्रायव्हिंग चा एक्सपिरीयन्स हवा आहे अशा लोकांसाठी तरी कार सुपर बेस्ट आहे.
3) 1.5-लिटर डिझेल:
इतकेच नाही तर आपल्याला ही कार लांब प्रवासासाठी देखील उत्तम पर्याय आहे आणि मध्ये दिले गेलेल्या इंजिन परफॉर्मन्स साठी डिझेलचा पर्याय एकदम परफेक्ट आहे
० डिझाइन
या कारचे म्हणजेच Venue चे डिझाइन अतिशय स्टायलिश क्लासी आणि ॲडव्हान्स आहे. या कारच्या एलईडी लॅम्प्सच्या आणि मोठ्या ग्रीलच्या वेगळेपणावरून ती स्वतःला बाकी काय अपेक्षा वेगळे बनवते. आपल्याला या कार मध्ये वेगवेगळे कलर ऑप्शन देण्यात आले आहेत त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. जे कारचे रूप आणि व्यक्तिमत्व दोन्ही देखील पालटून टाकतात.
० Hyundai venue चे इंटिरियर
Venue च्या आत मध्ये आपल्याला डॅशबोर्ड देण्यात आलेला आहे दिसायला एकदम स्टायलिश वाटतो. एवढेच नाही तर याबरोबर आपल्याला आठ इंचाची मोठी टच स्क्रीन देखील या कार मध्ये मिळून जाते. यासोबतच वायरलेस चार्जर चा पर्याय देखील मिळतो. आणि आपण हवेशीर फ्रंट सीटचा अनुभव या कारमध्ये घेतो. त्यामुळे लांब प्रवास सुद्धा या कारमध्ये आपल्याला सुखावह वाटतो
० सुरक्षा वैशिष्ट्ये
आपल्याला माहितीच आहे हुंडाई ही सेफ्टी प्राधान्य देणारी कंपनी हुंडाईने व्हॅल्यू मध्ये देखील आपल्याला अनेक सेफ्टी फीचर्स अवेलेबल करून दिले आहेत ज्यामध्ये समावेश होतो सहा एअर बॅग्स आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल यासोबतच आयसो फिक्स चाइल्ड सीट माउंट्स यांसारख्या फीचर्सचा.
Contents
Hyundai venue चे colour options :
या कारमध्ये आपल्याला साधारणपणे सहा मोनो टोन शेडस् मिळतात. आणि एक ड्युअल-टोन चा ऑप्शन देखील अवेलेबल करून दिला आहे. या कलर ऑप्शन्स मध्ये खालील कलर चा समावेश होतो.
१) टायटन ग्रे
२) डेनिम ब्लू
३) टायफून सिल्व्हर
४) फायरी रेड
५) ॲटलस व्हाइट
६) ॲबिस ब्लॅक
७) ॲबिस ब्लॅक रूफ विथ फायरी रेड.
Hyundai venue चे top features :
० आपल्याला या कारमध्ये मागील एसी व्हेंट्स अवेलेबल करून दिले आहेत.
० इतकेच नाही तर कार मध्ये आपल्याला पार्किंग सेन्सर्स देखील उपलब्ध करून दिले गेले आहेत.
० ग्राहकांमध्ये लोकप्रिय असणारे सनरूफ देखील या कारमध्ये देण्यात आले आहे.
० तसेच कार मध्ये अपडेट फीचर असावेत म्हणून ऍडव्हान्स इंटरनेट फीचर देखील देण्यात आले आहेत .
० इतकेच काय तर आपल्याला या कारमध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल देखील देण्यात आले आहे.
० या कारमध्ये आपल्याला कूल्ड ग्लोव्हबॉक्स देखील देण्यात आले आहेत.
० आपल्याला वायरलेस चार्जर पर्याय देखील कारमध्ये उपलब्ध आहे.
० इतकेच नाही तर ड्रायव्हर सीट ला आपल्याला ऍडजेस्टेबल करता येते.
० कारमध्ये आपल्याला एअर पुरिफायर यासोबतच क्रूज कंट्रोल आणि ADAS सारखे पिक्चर देऊ केले आहेत.
० आपल्याला या कारमध्ये ऑन बोर्ड वोईस कमांडचा पर्याय देखील देण्यात आला आहे.
Hyundai Venue चे डिटेल्स
Connected SUV:
Venue ही कार ठरले आहे भारतातली पहिली वहिली ब्ल्यू लिंकने कनेक्टेड असलेली एसयूव्ही.म्हणजे काय तर आपल्याला या कार मध्ये इंटरनेटच्या मदतीने गाडीचा कनेक्शन मिळते. ज्यामध्ये आपल्याला रिमोट स्टार्ट तसंच लाईव्ह ट्रॅफिक अपडेट आणि SOS ची सुविधा आपल्याला उपलब्ध होते.
० विक्रीचा उच्चांक:
हुंडाई वेन्यू ने तिच्या लॉन्च पहिल्याच दिवशी सगळ्यात मोठा विक्रम बनवला तो म्हणजे या कारचे एक लाखाहून अधिक युनिट्स ची विक्री झाली तेही लॉन्च च्या पहिल्याच दिवशी.
० हुंडाई वेन्यू चा ड्रायव्हिंग अनुभव
Venue या कारला चालवत असताना आपल्याला असं जाणवेल की या कार्डचे ट्रान्समिशन अतिशय स्मूद याबरोबरच आपल्याला स्टेबल राईड अनुभवायला भेटेल. या कारचे पेट्रोल वेरियंट आहे सिटी मध्ये चालवण्यासाठी अतिशय उत्तम असल्याचे आपल्याला जाणवेल तर तिचे डिझेलवर आपल्याला लांबच्या प्रवासासाठी अतिशय उपयुक्त ठरेल.
Venue या कारच्या ग्राउंड क्लीयरन्स बद्दल आता आपण बोलूया तर या कारचा 190mm एवढा ग्राउंड क्लिअरन्स असल्यामुळे ही कार आपल्याला खड्डे असणारा रस्त्यांवरूनही सहज चालवता येणार आहे बर का. या कार मध्ये देण्यात आलेलं सस्पेन्शन सिस्टीम देखील आपल्याला आरामदायी असल्याचे जाणवेल त्यामुळे खड्डे असणाऱ्या रस्त्यांवरून गाडी चालवताना देखील आपला प्रवास अतिशय आरामदायी आणि मजेशीर होतो.
Hyundai Venue चे competitors:
हुंडाई वेन्यूला टक्कर देण्यासाठी मार्केटमध्ये टाटा नेक्सॉन तसंच ब्रेजा आणि किया सॉनेट सारख्या गाड्या असल्या तरी देखील आपली वेन्यू ही तिच्यामध्ये असणाऱ्या ॲडव्हान्स फीचर्स आणि हुंडाई ची मार्केटमध्ये असणारी क्रेज यामुळे ग्राहकांसाठी ही कार नेहमीच विशेष आणि आवडती आहे.
Hyundai वेन्यू चे फायदे आणि तोटे
Hyundai Venue बाबत आवडलेल्या गोष्टी 👍🏻
1) लेटेस्ट डिझाईन मुळे वेन्यू ही कार अतिशय आकर्षक दिसते आणि ग्राहकांचे लक्ष तिच्याकडे वेधून घेते
2) ही कार आपल्याला उत्तम मायलेज देते डिझेलच्या पर्यायामध्ये जे साधारणपणे 22.7 kmpl इतके आहे.
3) या कारमध्ये इतर कार पेक्षा वेगळी अशी ब्ल्यू लिंग टेक्नॉलॉजी आणि फीचर्स आपल्याला दिले गेले आहेत.
वेन्यू मध्ये हव्या असणाऱ्या गोष्टी :
आपल्याला या कारच्या डिझेलवर चालणाऱ्या व्हेरिएंट वरती ऑटोमॅटिक ट्रान्समिशन चा पर्याय असायला हवा होता.
Hyundai वेन्यू चे top variants :
० SX(O): या कार च्या वरिएंट मध्ये आपल्याला बाकीच्या वेरियंट पेक्षा जास्त फीचर असल्याचे समजते आणि तसेच यामध्ये आपल्याला लक्झरी फील मिळतो.
Hyundai वेन्यू का निवडावे?
आता आपण बघूया की हुंडाई व्हॅन्यू का खरेदी केली पाहिजे. ती आपल्याला कशी फायदेशीर ठरणार आहे ते बघुयात. ही कार फक्त एसयूव्ही नाही तर ती एक दिसायला एकदम स्टाईलिश आहे तिचा इंजिन परफॉर्मन्स अतिशय उत्तम आहे तसेच यामध्ये सेफ्टी फीचर देखील भरपूर देण्यात आले आहेत. शहरामध्ये चालवायला ही कार अतिशय उत्तम आहे कारण मुळातच या कारचे डिझाईन हे भारतातल्या रस्त्यांवर चालवता येईल या दृष्टीनेच बनवण्यात आले आहे. खड्ड्यातून चालवताना देखील आपल्यालाही कार आरामदायी प्रवास घडू शकणार आहे लांब प्रवासासाठी ही कार सर्वोत्तम पर्याय ठरणार आहे. या सगळ्या कारणांमुळेच Hyundai Venue ला केवळ एसयूव्ही प्रेमीच नाही तर सर्वसामान्य लोक देखील तेवढीच पसंती देतात .
खिशाला परवडणाऱ्या किमतीत असे फीचर्स आणि प्रीमियम कार आपल्याला मिळते आहे.
Q) Hyundai Venue ची किंमत काय आहे?
A) प्रत्येक शहरानुसार कारची किमतीमध्ये आपल्याला कमी अधिक फरक जाणवेल पण तरीही साधारणपणे आपल्याला ही कार 9,35000 च्या आसपास पडेल ज्यामध्ये आपल्याला आरटीओ शुल्क आणि विमा ऍड केलेले राहिल.
Q) Hyundai वर डिसेंबरच्या महिन्यात काही लेटेस्ट ऑफर आहेत का?
A) तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार डिसेंबर 2024 मध्ये आपल्याला पुण्यातील शोरूम मध्ये ऑफर देण्यात येणार आहे.
Q) कोणती कार चांगली आहे वेन्यू किंवा ब्रेझा?
A) किमतीच्या बाबतीत बोलायचे झाले तर साधारणपणे वेन्यू ची किंमत आठ लाख आहे आणि ब्रेजा ची किंमत साडेआठ लाख. आपल्या गरजा पुरवणाऱ्या कार्सनुसार आपण आपली आवडती कार खरेदी करू शकता.
Q) Hyundai वेन्यू डाऊन पेमेंट किती करावे लागेल?
A) Hyundai Venue या कार्यासाठी आपल्याला साधारणपणे 98 हजार इतक डाऊन पेमेंट करावा लागेल. आणि 19000 इतका ईएमआय भरावा लागेल ते देखील पाच वर्षासाठी जवळपास 9.8 टक्के व्याज दराने 8.82 लाखाच्या कर्जावरती.
Q) Hyundai वेन्यू ही 7 सीटर SUV आहे का?
A) नाही Hyundai Venue ही सेव्हन सीटर कार नाही.
Q) Hyundai वेन्यू ही कार किती मायलेज देते?
A) व्हेन्यू आपल्याला साधारणपणे. 14.5 – 16 kmpl एवढं मायलेज देते.
Q) Hyundai वेन्यू ही किती सीटर कार आहे ?
A) ही कार 5 सीटर आहे.
या कार बाबतीत तसेच येणार्या आगामी कारचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी
आजच whatsapp group ला जॉईन व्हा.
याबाबत घ्या पुढील update साठी whatsapp किंवा telegram join करा.
असाच नवीन अपडेटसाठी आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा
https://chat.whatsapp.com/BiVKJ4X9Mue6xZFwMJrBUX
असाच नवीन अपडेटसाठी आमच्या Telegram ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा.
https://t.me/Automotonews_marathi
Maruti Suzuki Fronx 2024 खरेदी कशी फायदेशीर ठरू शकते