MG Comet EV: 6 इनोव्हेटिव्ह फीचर्स जी बनवतात तिला खास

MG Comet EV चीच निवड का करावी?

शहरात राहणाऱ्या लोकांमध्ये आता कॉम्पॅक्ट आणि इको फ्रेंडली कार खरेदी करण्याचे प्रमाण वाढत आहे. मोठ्या कार जरी आपल्याला अधिक बूट स्पेस ऑफर करत असल्या तरी देखील त्या पुणे मुंबई सारख्या शहरांच्या ट्रॅफिक मध्ये खूपच त्रासदायक याच समस्येच्या उपाय म्हणून एक स्मार्ट पर्याय आता मार्केटमध्ये आलेला आहे. तो म्हणजे MG Comet EV
MG Comet EV या कार बद्दल बोलायचं झालं तर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि खिशाला परवडणारी असून पण स्टायलिश डिझाईन असलेली कार आहे जर तुम्ही शोधत असाल तर ही कार तुमच्यासाठी अतिशय योग्य आहे.

MG Comet ची रचना आणि डिझाईन

कॉम्पॅक्ट डिझाईन:

MG Comet EV . या कारची लांबी फक्त २,९७४ मिमी असल्याने ही कार इंडियन मार्केट मधील सर्वात लहान गाड्यांपैकी एक आहे.

ड्युअल-टोन रंग:

या कार ला अधिक स्टायलिश करण्यासाठी यामध्ये निरनिराळ्या ड्युअल-टोन कलरचे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत ज्याने ही कार अतिशय आकर्षक दिसते.

एलईडी लाइट्स :

या कारमध्ये देण्यात आलेले ॲडव्हान्स LED हेडलॅम्प्स निया बरोबरच DRLs या कारला एक ऍडव्हान्स स्टायलिश लुक प्रदान करतात.

परफेक्ट सिटी कार:

ही कार मुळातच शहरातल्या रस्त्यांसाठी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे आपण तिला परफेक्ट सिटी कार अशी उपमा नक्कीच देऊ शकतो कारण शहरात असलेले अरुंद रस्ते आणि लहान पार्किंग जागांसाठी या कारचा आकार खूपच फायदेशीर सिटीतील हे दोन मुख्य समस्यांचे निवारण करणारी ही कार खरंच वरदान ठरते. या कारची मॅनेजिबिलिटी देखील उत्कृष्ट असल्यामुळे ट्रॅफिक मध्ये रस्ता शोधणे अतिशय सोपे होते.

परफॉर्मन्स आणि इंधन कार्यक्षमता :

MG Comet EV Battery आणि MG Comet Range

० या कारचा रेंज बद्दल जाणून घेऊयात. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार 230 किलोमीटरची रेंज देते जी शहरातील रेगुलर युज साठी नक्कीच पुरेशी आहे .
०होम चार्जर जर आपण वापरला चार्जिंग केले बॅटरी फुल चार्ज होण्यासाठी अंदाजे सात तास लागतात.

० मोटर आणि टॉर्क:
या कारमध्ये आपल्याला ४१.४२ bhp इतकी पॉवर आणि ११० Nm इतका टॉर्क देणारी इलेक्ट्रिक मोटर अवेलेबल करून देण्यात आली आहे. त्यामुळे शहरात ड्रायव्हिंग साठी आपल्याला जेवढी आवश्यक आहे तेवढी ताकद सहजपणे उपलब्ध होते..

MG Comet ची वैशिष्ट्ये :
० या ईव्ही कार‌ ची रेंज – 230 किमी इतकी आहे
० तर कारच्या पॉवर बद्दल सांगायचं झालं तर पॉवर – 41.42 bhp इतकी आहे
० आपल्या लाडक्या कारची बॅटरी क्षमता – 17.3 kWh इतकी असून
० या कारला आपल्याला चार्जिंग करण्यासाठी
चार्जिंग वेळ ही – 3.3KW 7H (0-100%)‌ इतकी आहे
० या कारमध्ये साधारणतः चार लोक आरामात बसू शकतात.
० कार मध्ये आपल्याला सेफ्टी साठी दोन एअरबॅक्स अवेलेबल करून देण्यात आले आहेत.

MG Comet EV Specifications

ईव्ही कारची रेंज: २३० किमीपॉवर: ४१.४२ bhp

बॅटरी क्षमता: १७.३ kWh

चार्जिंग वेळ: ३.३KW, ७ तास (०-१००%)

सीटिंग क्षमता: ४ लोक आरामात बसू शकतात

सुरक्षा वैशिष्ट्ये: २ एअरबॅग्स उपलब्ध

इंटिरियर: प्रगत व आरामदायी डिझाईन

० ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी:
या कारच्या इंटिरियर मध्ये आपल्याला १०.२५-इंचाचे डिस्प्ले सेटअप अवेलेबल करून देण्यात आला आहे ज्यामध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि इन्फोटेनमेंट सिस्टीमचा देखील समावेश केला गेला आहे.

०व्हॉइस कमांड्स :
या कारमध्ये देण्यात आलेल्या व्हॉइस कमांड्स या फीचरमुळे आपल्याला ते फीचर वापरण्यासाठी हाताने ऑपरेट करायची गरज पडत नाही.

सीट्स व जागा: सिटिंग क्षमता:
या कार मध्ये चार लोक सहज बसू शकतात परंतु मागील सीट हे मात्र लांबच्या प्रवासासाठी थोडे अरुंद वाटतात.

० बूट स्पेस:
या छोट्याशा कार मध्ये बूट स्पेस आपल्याला मोजकेच मिळते जास्त सामान ठेवण्यासाठी आपल्याला मागील सीट्स ला फोल्डकरावे लागते.

अन्य वैशिष्ट्ये:

० या कारमध्ये आपल्याला एक्स्ट्रा फीचर देखील देण्यात आले आहे त्यामध्ये कीलेस एंट्री समावेश होतो कीलेस एन्ट्री आणि स्टार्ट पर्याय हे अतिशय ॲडव्हान्स आणि तितकेच वापरण्यासाठी सोयीस्कर आहेत.
० रोटरी गियर नॉब आपल्याला तर सोपे आहेच पण त्यासोबतच ती गाडीचे इंटेरियर ला अगदी स्टायलिश बनवून टाकते.

MG Comet EV Safety Features :

चला तर मग त्या सुरक्षा उपायांबद्दल माहिती करून घेऊयात.

मुख्य सुरक्षा फीचर्स:

  1. या कारमध्ये देण्यात आलेले ड्युअल एअरबॅग्स हे पुढे बसलेल्या प्रवाशांना संरक्षण देतात.
  2. या कारमध्ये देण्यात आलेले एबीएस (ABS) सह ईबीडी (EBD) हे फीचर आपल्याला ब्रेकिंगमध्ये स्टॅबिलिटी आणि कंट्रोल राखण्यासाठी उपयोगी ठरते.
    3.लहान मुलांच्या प्रवासासाठी सुरक्षिततेसाठी ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स ते फीचर देखील यामध्ये देण्यात आले आहे.
  3. कमी जागेमध्ये इजिली पार्किंग करता यावी यासाठी आपल्याला रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आणि सेन्सर्स देखील या कार मध्ये अवेलेबल करून देण्यात आले आहेत.

MG Comet EV च्या स्पर्धकांशी तुलना

वैशिष्ट्यMG Comet EVटाटा टियागो EVसिट्रॉन eC3
किंमत (₹)७-९.६५ लाख८.६९-१२.०४ लाख११.५०-१२.१३ लाख
रेंज (किमी)२३०२५०३२०
बॅटरी क्षमता१७.३ — kWh१९.२ — kWh२९.२ — kWh

या कार बद्दल आवडलेल्या गोष्टी‌👍🏻:

  1. शहरात वापरण्यासाठी ही करा अतिशय योग्य आहे कारण ही आपल्याला अरुंद रस्त्यांवरती चालवायला सहज सोपी आहे..
    2 या कार मध्ये आपल्याला स्मार्ट टेक्नॉलॉजी बरोबरच ऍडव्हान्स‌ इन्फोटेनमेंट आणि कनेक्टिव्हिटी फीचर्स अवेलेबल करून देण्यात आले आहेत.
  2. अगदी खिशाला परवडणाऱ्या किमतीत मार्केटमध्ये उपलब्ध असल्याने ही EV बाजारातील अगदी किफायतशीर मॉडेल आहे.
  3. कार मध्ये झिरो एमिशन टेक्नॉलॉजी चा वापर केल्यामुळे ही कार एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे

कार बाबतीत निराशा जनक वाटणारे गोष्टी 👎🏻

  1. लिमिटेड बूट स्पेस आणि सीट्स यामुळे ही कार मोठ्या कुटुंबासाठी तसेच लांब प्रवासासाठी योग्य ठरत नाही .
  2. या कारला खास करून शहरातल्या रस्त्यांवर चालवण्यासाठी बनविले असल्याकारणाने हिची पॉवर आणि रेंज ही केवळ शहरापुरतीच मर्यादित आहे त्यामुळे ही कार हायवे ड्रायव्हिंग साठी योग्य ठरत नाही.
  3. या कारची NCAP चाचणी अजून करण्यात आलेली नाही त्यामुळे तिच्या सेफ्टी रेटिंग चा अंदाज लावता येत नाही.

किंमत आणि योजना

० किंमती:
१) केलेल्या रिसर्च च्या आधारे या कारची एक्स-शोरूम किंमत ही साधारणपणे अंदाजे ₹७ लाख ते ₹९.६५ लाख इतपत आहे
२) आणि या कारच्या बॅटरी रेंटल स्कीम बद्दल बोलायचं झाल्यास‌ बॅटरी रेंटल योजनेची स्टार्टिंग प्राईस ₹५ लाख असून त्यासोबत प्रति किमी ₹२.५ शुल्क‌ आकरण्यात येते.

MG Comet कोणासाठी योग्य?

० MG Comet निवडण्याचे कारण:

  1. शहरांमध्ये डेली यूज साठी अतिशय उपयुक्त पर्याय आहे ऑफिस ,शॉपिंग किंवा शाळेच्या प्रवासासाठी ही अतिशय योग्य पर्याय ठरते.
  2. जे लोक पहिल्यांदाच EV कार खरेदी करण्याचा विचार करत असतील त्यांच्यासाठी परवडणाऱ्या किमतीमध्ये ऍडव्हान्स फीचर देणारी ही कार खरंच उत्तम ठरेल.
  3. यंग प्रोफेशनल साठी ही कार मॉडर्न लुक सोबतच टेक्नॉलॉजी आणि एक स्टायलिश कार रियली गुड ऑप्शन आहे

तुमच्या गरजा आणि आवश्यकता पूर्ण करणारी ईव्ही निवडताना बजेट तसेच तिच्या उपयोगाचा प्रकार आणि कारची रेंज या सगळ्या गोष्टींचा विचार करावा.

Q: ही कार तुमच्यासाठी योग्य का?

Ans : जर तुम्हाला सगळ्यात स्वस्त आणि पर्यावरण पूरक शहरात वापरा करता यावी अशी गाडी हवी असेल तर ही गाडी तुम्ही विकत घेऊ शकता

कार खरेदीपूर्वी हे नक्की करा

ही कार खरेदी करण्यापूर्वी तुम्ही, जवळच्या MG मोटर्स डीलरशिपला नक्की भेट द्या आणि कारची टेस्ट ड्राईव्ह करून पहा तुमच्या गरजा ही कार पूर्ण करते आहे का ते तपासा.

तुम्हाला MG Comet EV ही कार कशी वाटते? तुम्हाला पडणाऱ्या प्रश्नांसाठी किंवा तुमचे अनुभव शेअर करण्यासाठी तसेच कार बद्दल अधिकाधिक अपडेट जाणून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.

याबाबत घ्या पुढील update साठी whatsapp किंवा telegram join करा.

असाच नवीन अपडेटसाठी आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा

https://chat.whatsapp.com/BiVKJ4X9Mue6xZFwMJrBUX

असाच नवीन अपडेटसाठी आमच्या Telegram ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा.

https://t.me/Automotonews_marathi

Tata Punch EV: मार्केटमध्ये गेमचेंजर टाटा पंच EV 2024 ची संपूर्ण माहिती

Leave a Comment